महेश मांजरेकरांचा लेक सत्या मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या घोषणेदरम्यान भलताच चर्चेत होता. आता पुन्हा एकदा सत्या चर्चेचा विषय बनला आहे. सिनेविश्वात असे बरेच कलाकार आहेत जे अभिनया सोबतच व्यावसायिक म्हणून कार्यभार पाहत आहेत. मांजरेकरांच्या लेकानेही आपली पावलं अभिनयाकडून व्यवसायाकडे वळविली आहेत. (satya manjrekar new business)
सत्याने अभिनयासोबतच नवीन हॉटेल सुरु केलं असल्याची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली आहे. मांजरेकरांच्या किचनमध्ये आणखी एका किचनची एंट्री झाली आहे. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी सत्याने सगळ्यांसाठी ‘सुका सुखी’ नावाचं हॉटेल सुरु केलं आहे. त्याने हे हॉटेल त्याची बिझनेस पार्टनर सिद्धी दळवी सोबत सुरु केलं असल्याचं केलेल्या स्टोरी पोस्टवरून लक्षात येतंय.

पहा सत्याने सुरु केला हा व्यवसाय (satya manjrekar new business)
सत्या मांजरेकर याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून नवीन हॉटेल सुरु केल्याची खास बातमी शेअर केली आहे. सत्याच्या या हॉटेलचं नाव ‘सुका सुखी’ असे असून ‘सुका सुखी…द मांजरेकर्स किचन अशा नावाने हे हॉटेल सुरु केलं आहे. मालवण ते आमची मुंबई पर्यंतची माश्याची चव सत्याच्या या नव्या हॉटेलमध्ये चाखायला मिळणार आहे. शिवाय प्रादेशिक पदार्थांचं वितरण येथे केले जाणार आहे. सत्याच्या अनेक मित्र मैत्रिणींनी सत्याला या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्क्रिनशॉट शेअर करत सत्याने त्यांचे आभार मानले आहेत. या पोस्ट वरून असं कळतंय की, सुखी मच्छी हा या हॉटेलच्या मेन्यू कार्डवरचा खास मेन्यू असणार आहे.
====
हे देखील वाचा – ‘शिव ठाकरेच्या मेहनतीचं फळ’आयुष्यात नवीन सदस्यांची एन्ट्री
====
मासेप्रेमींसाठी ही एक हक्काची जागा असणार आहे. सत्याने व्यावसायिक बनण्यासाठी एका वेगळ्याच क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सत्याची ही नवी इनिंग नक्कीच त्याला उंचीवर नेऊन ठेवेल यांत शंकाच नाही. महेश मांजरेकर दिगदर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. यांत सत्या मांजरेकर साकारत असलेलं पात्र प्रेक्षकांच्या नापसंतीस पडलं आहे. सत्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.(satya manjrekar new business)
सत्याने सुरु केलेल्या या नव्या व्यवसायात मात्र सत्या नक्कीच बाजी मारेल यांत शंका नाही. साऱ्या मासेप्रेमींसाठी मांजरेकरांचं हे नवं किचन सदैव तत्पर असेल.
