सोमवार, मार्च 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हक्काच्या घरात हक्काच्या माणसांसह एंट्री, वनिता खरातच्या नव्या घराची झलक, भावुक झाली आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 15, 2025 | 2:04 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
vanita kharat new home new

हक्काच्या घरात हक्काच्या माणसांसह एंट्री, वनिता खरातच्या नव्या घराची झलक, भावुक झाली आणि…

vanita kharat new home new : मराठी मनोरंजनविश्वात कलाकार मंडळी एकापाठोपाठ एक आनंदाची बातमी देताना दिसत आहेत. सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळी एकामागोमाग एक आनंदाची बातमी देताना दिसत आहे. अशातच आपल्या एका मराठी अभिनेत्रीने स्वतःच हक्काचं नवंकोरं घर घेतलं असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने ही बातमी दिली. अशातच आता सगळ्या आनंदाच्या वातावरणातील नव्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. हक्काच्या माणसांसह हक्काच्या घरात एन्ट्री करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात.

वनिता खरातने काही दिवसांपूर्वीच नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी दिली होती. मात्र, आता तिनं तिच्या या नव्या घरात हक्काच्या माणसांसह एंट्री केली आणि तिच्या नव्या घराची झलक दाखवली. यावेळी तिचे सगळे कुटुंबीय तिच्याबरोबर उभे असलेले दिसले. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील अनेक कलाकार मंडळीही वनिताला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. नम्रता संभेराव, रोहित माने ही कलाकार मंडळी वनिताच्या आनंदाच्या क्षणी तिच्याबरोबर होती.

आणखी वाचा – साखरपुडाही उरकला, लग्नाचा विचार सुरु आणि…; ‘धुरंधर’ फेम अभिनेत्याची कबुली, लग्नाआधीच आहे दोन मुलांचा बाबा

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वनिता खरात तिच्या नव्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे. या शिवाय नव्या घरात गेल्यानंतर ती एक छोटीशी पूजा करतानाही दिसली. यावेळी तिचा पती सुमितही तिच्याबरोबर होता. घरात एंट्री केल्यानंतरचे काही सुरुवातीचे विधी केल्यानंतर त्यांनी एकत्र फोटोसेशनही केलेलं पाहायला मिळालं. यावेळी तिच्या घराची झलक पाहायला मिळाली. गॅलरीतूनही खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. तर किचन-हॉलची झलक यावेळी पाहायला मिळाली. आता घर तयार केल्यानंतर ते कसं असणार आहे, वनिता तिचं घर कसं सजवणार?, हे पाहणं रंजक ठरणार आहे. वनिताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

Tags: marathi actressnew homevanita kharat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Facts
Entertainment

आई-वडीलांचं निधन आणि शेतमजुरी; रील स्टार सुरज चव्हाणला ‘असं’ मिळालं FAME, UNKNOWN FACTS

मार्च 29, 2026 | 11:00 am
Anurag Dobhal news
Entertainment

‘बिग बॉस’ फेम अभिनेता झाला बाबा, काही दिवसांपूर्वीच अपघातातून वाचला, फोटोद्वारे दाखविली पहिली झलक

मार्च 28, 2026 | 5:25 pm
Varun Dhawan Daughter
Entertainment

वरुण धवनच्या दीड वर्षीय मुलीला झालेला गंभीर आजार, लेकीबाबत पहिल्यांदाच बोलला, म्हणाला, “वाकडं चालायची…”

मार्च 28, 2026 | 2:35 pm
Zee Marathi Serial Update
Entertainment

आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर केली अन्…

मार्च 28, 2026 | 2:00 pm
Next Post
Pooja-Soham New Home

लग्नानंतर बांदेकरांच्या लेकानं-सूनेनं थाटला वेगळा संसार; 'तो' फोटो पाहताच चाहत्यांच्या चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.