शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकाच्या संगीत सोहळ्यात भाव खाऊन गेले आदेश व सुचित्रा बांदेकर, शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले, व्हिडीओ पाहताच चर्चेला उधाण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 2, 2025 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aadesh and suchitra bandekar dance video

लेकाच्या संगीत सोहळ्यात भाव खाऊन गेले आदेश व सुचित्रा बांदेकर, शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकले, व्हिडीओ पाहताच चर्चेला उधाण

aadesh and suchitra bandekar dance video : सध्या मराठी मनोरंजन विश्वात आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाची म्हणजेच सोहम बांदेकरच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर सोहम व पूजाची लगीनघाई पाहायला मिळाली. आज ही जोडी सात फेरे घेत लग्नबंधनात अडकणार आहे. काल पूजा व सोहम यांचा अगदी धुमधडाक्यात हळदी समारंभ पार पडला. त्यांच्या हळदीला कलाकार मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. इतकंच नाहीतर पूजा व सोहमच्या संगीत सोहळ्याची धमाल-मस्तीही तुफान व्हायरल झाली. यावेळी सोहम व पूजाने सुंदर आणि धमाकेदार डान्स करत संगीत सोहळ्याची रंगत वाढविली. दोघांचा रोमँटिक अंदाज विशेष भावला.

संगीत सोहळ्यासाठी सोहम व पूजा यांनी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी पांढऱ्या रंगातील इंडो-वेस्टर्न कपड्यांना प्राधान्य दिलं. आणि दोघेही या त्यांच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते. सोहम-पूजाच्या संगीत सोहळ्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे ती म्हणजे आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांच्या डान्सची. लेकाच्या संगीत सोहळ्यात आदेश व सुचित्रा थिरकले आणि दोघांनी साऱ्यांच्या नजरा वळविल्या. शाहरुख खानच्या गाण्यावर दोघांनी भन्नाट डान्स केला आणि साऱ्यांचं लक्ष वेधलं.

आणखी वाचा – सोहम बांदेकर पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो व्हायरल, उत्सुकता वाढली

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

सोहमच्या संगीत सोहळ्यात आदेश व सुचित्रा “मेरे मेहबूब मेरे सनम…” या गणयावर थिरकले. शाहरुखच्या डुप्लिकेट सिनेमातील हे गाणं असून दोघांनी या गाण्यावर ठेका धरला. आदेश व सुचित्रा यांचा एकत्रित डान्स अनेकांच्या पसंतीस पडला. आणि दोघांना नाचताना पाहून अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं. सोहम पूजाच्या संगीत सोहळ्यात आदेश-सुचित्रा त्यांच्या डान्समुळे भाव खाऊन गेले. तर इतरही कुटुंबीयांनी डान्स करत साऱ्यांचं मनोरंजन केलं.

आणखी वाचा – Video : आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकरच्या लेकाच्या हळदीत मराठी कलाकारांचा तुफान राडा, जबरदस्त डान्स अन्…; व्हिडीओ व्हायरल

आज २ डिसेंबरला सोहम व पूजा लग्नबंधनात अडकणार आहेत. सोहमचा लग्नसोहळा हा लोणावळा येथे पार पडणार आहे. आणि अनेक कलाकार मंडळी दोघांना आशीर्वाद द्यायला उपस्थित राहणार आहेत.

Tags: aadesh and suchitra bandekarmarathi actorswedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
 Divyanka Tripathi Discharged From Hospital
Entertainment

सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई

मे 30, 2026 | 10:03 am
Next Post
Soham Bandekar and Pooja Birari Wedding

Soham Bandekar and Pooja Birari Wedding : शुभमंगल सावधान! सोहम बांदेकर व पूजा बिरारीचा थाटामाटात विवाहसोहळा संपन्न, मंडपातील व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.