Hrithik Roshan Sussanne Khan Son : हृतिक रोशन आणि सुझान खान हे रेहान व हृधन या दोन मुलांचे पालक आहेत. अनेकदा सुझानच्या इन्स्टाग्राम फोटो व व्हिडीओमध्ये ते दिसतात. अलीकडेच सुझैनच्या वाढदिवसाच्या वेळी हृतिक दिसला होता. अशातच त्यांच्या नवीन फोटोने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि चाहत्यांना विश्वास बसत नाही की, त्यांची दोन्ही मुलं किती मोठी झाली आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून तर्क वितर्क लावायला सुरुवात केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून म्हटलं की, ते बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्यास तयार झाले आहेत. तर एकाने असेही म्हटले की, तो त्याचा मामा झायेद खानसारखा दिसतो.
सुझैन खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिची मुले रेहान व हृधनबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचा आहे आणि त्यात सुझैन मध्यभागी पोज देताना दिसत आहे. तिने तिच्या वाढदिवसासाठी काळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला असताना, तिचा मुलगा काळ्या टी-शर्टमध्ये मॅचिंग जॅकेट आणि राखाडी कार्गो पँटमध्ये दिसला. त्याच्याबरोबरचे फोटो शेअर करताना सुझैनने त्याला तिची ‘सनशाईन’ म्हटले. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी वर पाहिले आणि तुम्ही दोघे माझ्या शेजारी उभे आहात. काय वाटत आहे माझा मुलगा”.
फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी त्यांची मुलं मोठी झालेली पाहून आश्चर्यकारक कमेंट करायला सुरुवात केली. एका चाहत्याने लिहिले, “बॉलीवूडचा पुढचा सुपरस्टार”. तर दुसरा म्हणाला, “इतक्या वर्षांनंतर रेहान व हृधनला पाहणे आश्चर्यकारक आहे. तू खूप मोठा झाला आहेस. तुम्हा दोघांचा खूप अभिमान आहे. उत्कृष्ट कार्य करत रहा आणि चमकत रहा”. काही इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी त्याचे स्वरुप सुझैनचा भाऊ झायेद खानसारखे असल्याचे म्हटले आहे. तर एकाने म्हटले आहे की, “एक हृतिकसारखा दिसतो आणि दुसरा तुझा भाऊ झायेदसारखा दिसतो”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम डीपी दादासाठी इरिनाने बनवलं खास मटण, त्यानेही ताव मारला अन्…; म्हणाली, “भावा नुसतं….”
हृतिक रोशन व सुझैन खानने डिसेंबर २००० मध्ये लग्न केले. त्यांनतर त्यांनी २००६ मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, रेहानचे स्वागत केले, तर हृधनचा जन्म २००८ मध्ये झाला. हे जोडपे २०१३ मध्ये वेगळे झाले आणि नोव्हेंबर २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. सुझैन आता अर्सलान गोनीला डेट करत आहे. तर हृतिक रोशन गेल्या काही वर्षांपासून सबा आझादसह रिलेशनशिपमध्ये आहे.