Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळा सुरु आहे. जिथे सर्वसाधारण लोकांव्यतिरिक्त सुप्रसिद्ध कलाकारही संगमात स्नान करत या महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत. अशातच आता हिना खानचा प्रियकर रॉकी जयस्वालही महाकुंभ येथे पोहोचला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओओ पोस्ट करुनत्याने याची एक झलक दर्शविली आहे. हिनाने हा व्हिडीओ संपादित केला आहे, जी सध्या स्तनाच्या कर्करोगाने झगडत आहे. अभिनेत्री कर्करोगाशी झगडत असतानाच आता तिच्या बॉयफ्रेंडने महाकुंभ मेळ्यात हजेरी लावत पवित्र स्नान केले आहे. हिना खानचा प्रियकर रॉकी जयस्वाल याने महाकुंभचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
‘हर हर महादेव’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “मी खूप भाग्यवान आहे की मी माझ्या कुटुंबात महाकुंभमध्ये भाग घेणारी पहिली व्यक्ती आहे. उर्जा मनाला त्रास देणार होती आणि संगमाचे वाहणारे नदीचे पाणी नम्र आणि भारावून गेले. महाकुंभला जोपर्यंत मानलं जातं त्याबाबत अनेक पुराणात नमूद केलं आहे. हजारो वर्षांपासून सतत आयोजित करणे ही एक पवित्र घटना मानली जाते. प्रयागराज हे मानवी सभ्यतेचे एक केंद्र आणि बुद्धिमत्तेचा जन्म मानले जाते, ज्याचे वर्णन सॅमुद्र मथनच्या कथेत केले गेले आहे”.
आणखी वाचा – “त्यापेक्षा दारू, तंबाखू चांगला”, नागा चैतन्यचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “तुमच्या शरीरासाठी…”
रॉकीने पुढे लिहिले आहे की, “सूर्य, चंद्र, शुक्र, मंगळ, बृहस्पति, शनि, युरेनस आणि नेपच्यून (मुख्यतः) सरळ रेषेत आहेत, परंतु ते खूप विशेष आहे, कारण ज्युपिटरच्या सूर्याभोवती 12 फेऱ्या आहेत. पृथ्वीसाठी १४४ वर्षे. तीन नद्यांमध्ये म्हणजेच गंगा, यमुना आणि (लपविलेले) सरस्वती या तीन मध्ये खनिज आणि कंपने आहेत, जे या काळात घडले आहे असे मानले जाते, जे आकलनपलीकडे आहे. मी तेथे संस्कृती, श्रद्धा आणि समर्पणासाठी गेलो. प्रत्येकाने एकदा याचा अनुभव घेतला पाहिजे”.
हिना खानला स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्यापासून ती तिच्या चाहत्यांना आरोग्याविषयी सतत अपडेट देत आहे. आता या कठीण काळात तिचा बॉयफ्रेंड रॉकी तिला प्रत्येक पावलावर कशी साथ देत आहे हे अभिनेत्रीने सांगितले आहे. हिनाने रॉकीबरोबरचे तिचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. रॉकीला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर हिना खानने तिचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये रॉकी अभिनेत्रीला खाऊ घालण्यापासून तिला मसाज करताना दिसत आहे.