बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

माधुरी दीक्षितच्या पतीचं मराठी ऐकलंत का? भर कार्यक्रमात बोलण्याचा प्रयत्न केला पण…; म्हणाले, “यांच्यासारखं मराठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 13, 2023 | 6:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhuri Dixit And Shriram Nene

माधुरी दीक्षितच्या पतीचं मराठी ऐकलंत का? भर कार्यक्रमात बोलण्याचा प्रयत्न केला पण…; म्हणाले, "यांच्यासारखं मराठी…"

बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरीचं हिंदी सिनेसृष्टीत मोठं योगदान आहे. कधी मोहिनी, तर कधी चंद्रमुखी, तर कधी बेगम पारा बनून तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून छाप पाडत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आजही लोक माधुरीच्या अदांचे, तिच्या सौंदर्याचे तसेच तिच्या अभिनयाचे चाहते आहेत. माधुरीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयासह माधुरी दीक्षित उत्तम नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहे. (Madhuri Dixit And Shriram Nene)

माधुरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपासून माधुरीच्या नव्या चित्रपटामुळे ती चर्चेत असलेली पाहायला मिळाली. माधुरीने तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह मिळून ‘पंचक’ या नव्या सिनेमाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा दणक्यात पार पडला. या ट्रेलर लॉंच सोहळयाला माधुरीसह तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही हजेरी लावली होती.

आणखी वाचा – “आर्थिक अडचणीमुळे घर भाड्याने दिलं अन्…”, अमृता खानविलकरला आली स्वामींची प्रचिती, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “स्वामींचा फोटो…”

चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्याला माधुरीसह तिचे पती डॉ. नेने यांनीही संवाद साधला. माधुरीला अनेकदा मराठीत बोलताना ऐकलं आहे पण डॉ. नेनेंना मराठीमध्ये बोलताना ऐकलेलं नाही. अशातच माधुरी व डॉ. नेने यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते मराठीत बोलताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या ‘पंचक’ चित्रपटाबद्दल मराठीत माहिती दिली. “माझं मराठी यांच्यासारखं नाही, पण या चित्रपटाचा विनोद वेगळ्याच उंचीवर नेणारा आहे आणि हा चित्रपट सगळी नाती उत्तम दर्शवतो,” असं ते व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – जन्माला आल्यानंतर राधा सागरच्या मुलाचा मोठ्या आजाराशी सामना, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “श्वास घ्यायला त्रास झाला अन्…”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी डॉ. श्रीराम नेने यांच्या मराठीचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी त्यांना त्यांच्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, संपदा जोगळेकर, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी हे कलाकार झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

Tags: dr. shriram nenemadhuri dixitmarathi moviepanchak marathi movieshriram nene
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
marathi actress rupali bhosle shared video pf aai kuthe kaay karte set on instagram

'आई कुठे…'चा सेट उभा करण्यासाठी इतकी करावी लागते मेहनत, रुपाली भोसलेने दाखवला Inside Video, म्हणाली, "मालिकेच्या सेटचे घर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.