शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लालबागचा राजा गरीबांचा का फक्त VVIP चाच?”, दर्शनावेळी दुजाभाव करताच भाविक भडकले, थेट व्हिडीओ शेअर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2025 | 4:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
LalBaughcha Raja Ganpati Festival

"लालबागचा राजा गरीबांचा का फक्त VVIP चाच?", दर्शनावेळी दुजाभाव करताच भाविक भडकले, थेट व्हिडीओ शेअर

LalBaughcha Raja Ganpati Festival : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. मुंबईत मोठमोठे गणपती, आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविक जात असतात. मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक रात्र रात्र रांगा लावतात. बरं. इतक्या रांगा लावूनही लालबागच्या राजाचे दर्शन होईलच याची शाश्वती नाही. या सगळ्यात चांदी आहे ती VVP लोकांची. सामान्य भक्त १८ ते २० तास रांगेत उभे असतात, तर याउलट VVP रांगांमधून काही माणसं केवळ अर्ध्या तासात दर्शन घेऊन बाहेरही पडतात. हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारावा वाटतो?, पण तो कोणाला?. अनेक कलाकार, दिग्गज मंडळी, कमिटी मेंबरचे नातेवाईक यांच्यासाठी सहज दर्शन आहे.

या सगळ्या वादावादीत एका भाविकाने शेअर केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यांत लालबागच्या राजाच्या सेवकासह त्या भाविकाचा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असं म्हटलं आहे की, “लालबागचा राजा खरंच गरीबांचा राजा राहिला का फक्त VVIP चाच? मुंबईतील लालबागचा राजा हा देशभरातील भाविकांसाठी आस्था आणि श्रद्धेचं केंद्र आहे. प्रत्येक वर्षी लाखो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. ‘गरिबांचा राजा’ ही ओळख असलेल्या या गणेशोत्सव मंडळाबद्दल आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत”.

आणखी वाचा – “ट्रोलिंग करणं सगळ्यात सोपी गोष्ट”, प्रथमेश परबच्या पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, “खूप गरजेचं आणि…”

View this post on Instagram

A post shared by Rakesh Maske (@maske_official77)

पुढे त्याने लिहिलं आहे की, “भाविकांचं म्हणणं आहे की, तिथले काही स्वयंसेवक अत्यंत उद्धट, अकार्यक्षम आणि अहंकारी वर्तन करतात. रांगेत उभ्या असलेल्या सामान्य भक्तांना कारणाविना धक्के दिले जातात, त्यांच्याशी अयोग्य भाषेत वागलं जातं. दुसरीकडे, “VIP आणि VVIP” लोकांना सहज दर्शन मिळतं, तर तासंतास रांगेत थांबलेल्या भक्तांना अपमानास्पद वागणूक सहन करावी लागते. त्यामुळे हा खरंच गरिबांचा राजा आहे का, की फक्त श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांसाठीचा?, असा प्रश्न भक्तांच्या मनात निर्माण झाला आहे”.

आणखी वाचा – टायमिंगचे बादशाह एकत्र, कुरळे बंधू आणणार मोठ्या पडद्यावर रंगत; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

शेवटी त्याने म्हटलं, “लालबागचा राजा हा सर्वांचा आहे. त्याच्या दर्शनात भेदभाव, उद्धटपणा किंवा फक्त VVIP साठी विशेष वागणूक देणं हे भक्तांच्या श्रद्धेला धक्का देणारं आहे. प्रशासनाने आणि मंडळाने तातडीने लक्ष देऊन भक्तांना योग्य तो सन्मान, सुविधा आणि सुरक्षितता दिली पाहिजे, हीच सर्वांची अपेक्षा आहे”.

Tags: lalbaugcha raja 2025LalBaughchaRajamumbai
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Ashish Warang Passed Away

Ashish Warang Death : ‘सिंबा’ फेम अभिनेते आशिष वारंग यांचे निधन, वयाच्या ५५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.