प्रत्येक जण सिनेसृष्टीत येण्याची स्वप्न पाहतो, त्यासाठी ते मुंबईत येतात. पण त्यातील काहींची स्वप्ने पूर्ण होतात, तर काहींची अर्धवट राहतात. काहींच्या मागे मोठा वलय असतो, तर काहींचा या दुनियेशी कोणताच संबंध नसतो. मात्र तरीही अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती म्हणजे, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन. (Kriti Sanon)
‘मिमी’, ‘हीरोपंती’, ‘लुका-छूपी’, ‘आदिपुरुष’ यांसारख्या सिनेमांमध्ये दिसणारी अभिनेत्री क्रिती सेनन आज आपला ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्लीत क्रितीचा जन्म झाला. तिचे वडील एका बँकेत चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तर आई दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर. क्रिती प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना तर आहे, शिवाय ती राज्यस्तरीय बॉक्सरदेखील आहे. पण लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड असल्याने क्रिती अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायची. त्यातूनच तिचा सिनेसृष्टीतला प्रवास सुरु झाला. (Kriti Sanon celebrate her 33rd Birthday)
आज आहे बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री (Kriti Sanon Birthday)
साऊथचा सुपरस्टार महेश बाबूच्या ‘१ : नेनोक्कदिने’ या सिनेमातून क्रितीची सिनेसृष्टीत एन्ट्री झाली असली, तरी टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती’ सिनेमातून क्रितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि क्रितीचे नशीब उजळायला लागले. त्यानंतर तिने ‘बरेली की बर्फी’, ‘लुका-छूपी’, ‘मिमी’ व नुकताच आलेला ‘आदिपुरुष’ सिनेमासह अनेक हिंदी व साऊथ सिनेमे केलेले आहे. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी क्रितीने अनेक अॅड फिल्म्स केल्या होत्या. क्रितीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झाल्यास, ती लवकरच टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’ सिनेमात दिसणार आहे.

बॉलीवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाणारी क्रिती एका सिनेमासाठी तब्बल ४ कोटी रुपयांचं मानधन घेते. शिवाय तिचा स्वतःचा ब्रँड देखील असून त्याबरोबर तिची मुंबईतील अनेक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे. परंतु तिचे मुंबईतील जुहू भागात एक अतिशय सुंदर घर आहे, ज्याची किंमत तब्बल ६० कोटी इतकी आहे. (Kriti Sanon Birthday)
हे देखील वाचा : “दोन्ही बाजूंनी प्रेम”, सनी देओलने भारत आणि पाकिस्तानमधील द्वेषासाठी ‘राजकीय खेळा’ला जबाबदार धरले