मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, तसेच निर्माती क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियाद्वारे अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाने व नृत्यकौशल्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे मजेशीर व्हिडीओही पोस्ट करत असते. त्यांच्या अनेक करामती ती व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो.
अशातच क्रांतीने नुकताच आणखीन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांतीने शेअर केलेला हा नवीन व्हिडीओ तिचा किंवा तिच्या लेकींचा नसून क्रांतीच्या पतीचा म्हणजेच समीर वानखेडे यांचा आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती समीरबरोबर काही मौल्यवान क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती यॉटमधून फिरत आहे आणि यादरम्यान तिने पतीबरोबरचे काही खास व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओला क्रांतीने एका शायरीचा ऑडिओ लावला आहे. क्रांतीने फैजल मिर्झा यांच्या “उसको देखा तो मैं समझा, हो सकता है, एक इंसान भी पूरी दुनिया हो सकता है” या शायरीचा ऑडिओ लावला आहे.
तसेच या व्हिडीओखाली क्रांतीने हटके कॅप्शनही लिहिलं आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “जेव्हा तुमचा नवरा तुमच्यापासून लांब एका वेगळ्या शहरात काम करतो तेव्हा कधी कधी अशा ओळी प्रेमाची अभिव्यक्ती बनतात”. क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली “जेव्हापासुन तुमचं सरांबरोबर लग्न झालं आहे, तेव्हापासुन सरांच्या चेहर्यावरची स्माईल गायबच झाली” अशी मजेशीर कमेंट केली आहे. यावर क्रांतीनेही हसण्याचे इमोजी पोस्ट करत प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – नवऱ्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकरांनी अविनाश यांना केकही भरवला अन्…; फोटो व्हायरल
क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी “समीर हसत नाहीत का?” , “त्यांनी हसलं पाहिजे” अशा अनेक कमेंट्स करत त्यांना “स्माईल प्लीज” म्हटलं आहे. दरम्यान, समीर कामाबरोबरच कुटुंबालादेखील वेळ देत असल्यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. तसेच समीर यांना क्रांतीसारखी पत्नी व क्रांती यांना समीरसारखा पती मिळाल्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना दोघांचेही कौतुक असल्याचे त्यांनी या व्हिडीओखाली म्हटलं आहे.