आई नंतर वडील चं मुलांचं सर्व काही असतात. वरून कठोर पण आतून हळवा असेलला बाप मुलांना खूप उशिरा समजतो. जस आईच मुलांशी तसं बापच मुलीशी घट्ट नातं असतं. मुलींच्या आयुष्यात बाबा हेच त्यांचं पहिलं प्रेम असतं. असच बाप लेकीचं नातं सांगणारा एक व्हिडीओ अभिनेत्री क्रांती रेडकरने शेअर केला आहे. (Kranti Redkar Daughters Bonding)

क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या दोन्ही मुली त्यांच्या बाबांना आलेलं पाहून, धावत जाऊन त्यांना मिठी मारताना दिसतायत. क्रांतीने या गोड व्हिडिओला ” फादर्स डे वर्षातून एकदा साजरा न करता तो नेहमी साजरा केला पाहिजे. कारण आपल्या कुटूंबावर कोणतेही संकट येणार नाही याची ते नेहमी खात्री करत असतात. असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा: संकेत-सुपर्णाच्या लग्नातील खास क्षण- निवेदिता झाल्या भावुक
आणि पुढे Tag all the husbands who are amazing Dads here ” असं आव्हान तिने महिलांना केलं आहे. क्रांतीच्या या व्हिडिओवर एका चाहतीने “Wow..कितीही काही झालं तरी वडिलांचं प्रेम आपल्या मुलींवर जास्त असतं” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी क्रांतीला मुलींचे चेहरे दाखवण्याची मागणी केली आहे. (Kranti Redkar Daughters Bonding)
हे देखील वाचा: ‘फ्लॉवर नहीं फायर है मॅडम’प्रार्थनाच्या फोटोवर श्रेयसची हटके कमेंट
क्रांती तिच्या मुलींचे आणि आईचे मजेशीर व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करतच असते. परंतु क्रांतीने आजवर मुलींचे चेहरे सोशल मीडियावर दाखवलेच नाही आहेत. याच प्रमाणे क्रांतीचा नवरा समीर वानखेडे याला देखील जास्त सोशल मीडियावर स्वतःला दाखवायला आवडत नाही. क्रांतीला मात्र या सगळ्याचा छंद असल्यामुळे ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या चाहत्यांना क्रांतीच्या लेकीची तोंड जरी दिसली नसली, तरी त्याची झलक पाहायला मिळाली आहे.