शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यादिवशी मी Antilia कडे बघत होते”, अंकिता वालावलकरने मुंबईत घेतलं नवं घर, फोटो दाखवत म्हणाली, “Risk…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 19, 2026 | 11:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Walawalkar New House

"त्यादिवशी मी Antilia कडे बघत होते", अंकिता वालावलकरने मुंबईत घेतलं नवं घर, फोटो दाखवत म्हणाली, "Risk…"

Ankita Walawalkar New House : मुंबईत स्वतःच हक्काचं घर घेणं ही काही आता साधीसुदी गोष्ट राहिलेली नाही. अनेकांचं हे स्वप्न स्वप्नंच राहतं, तर काहीजण हे स्वप्न पूर्णही करतात. सर्वसामान्यांबरोबर अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांचं स्वतःच घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. यापाठोपाठ आता आणखी एका सेलिब्रिटी कपलने घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. आज गुढीपाडव्याचे औचित्य साधत या जोडप्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे. हे जोडपं म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकर आणि संगीतकार कुणाल भगत. अंकिता आणि कुणाल यांनी स्वतःच हक्काचं घर घेतलं आहे आणि सोशल मीडियावर घराचे फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे. यांत त्यांच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. मात्र, या पोस्टखालील कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अंकिताने पोस्टखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “घर घेणं, हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते पण मनात एकच विचार “माझं घर कधी?”मी कुठेतरी वाचलं होतं स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची कारण लायकी आपण वाढवू शकतो, पण छोटं स्वप्न मोठं होत नाही. मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल. मी कित्येकदा पेडर रोडवरुन फेऱ्या मारायचे. अंबानींच्या antilia समोर उभी राहायचे. त्या उंच इमारतीकडे बघायचे,आणि स्टोरी टाकायचे “एक दिन मेरा भी घर होगा”. लोकांसाठी ती फक्त एक स्टोरी होती पण माझ्यासाठी ती प्रार्थना होती. विश्वाला केलेली एक शांत हाक होती. आज विचार केला तर अंगावर शहारे येतात. आणि योगायोग बघा आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे, त्या टॉवरचं नाव आहे “Antilia”. हा योगायोग आहे? की स्वामींची इच्छा?”.

आणखी वाचा – ‘धुरंधर 2’च्या pre-booking ने उडवला धुमाकूळ, बॉलिवूडच्या सगळ्याच चित्रपटांना टाकलं मागे, केली इतकी कमाई…

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

पुढे तिने म्हटलं, “मी जिथे नोकरी करायचे तिथले आमचे काँट्रॅक्टर पटेल गुजरातीमध्ये म्हणायचे, “Rotla male easy chhe, pan Mumbai ma ghar male mushkil chhe.”रोटी कमवणं सोपं आहे…पण मुंबईत स्वतःचं घर? खूप अवघड. त्या वाक्याने पण मी कधी घाबरले नाही, उलट ठरवलं होतं, एक दिवस मीच माझ्या घराच्या चाव्या हातात घेणार. लग्नानंतर हे “माझं” स्वप्न “आमचं” झालं. कारण आता घर फक्त चार भिंती नव्हत्या, ते आमचं future होतं… आमची सुरक्षितता होती. वर्षभर आम्ही घरांच्या शोधात भटकलो. प्रत्येक घरात गेलो पण मन म्हणायचं, नाही… अजून नाही. एक वेळ अशी आली की, स्वप्न थोडंसं शांत झालं. “कदाचित अजून वेळ आहे” असं आम्ही स्वतःलाच समजावलं.आणि मग अचानक हे घर समोर आलं. दरवाजा उघडला आणि मन म्हणालं “हेच!”. पण आकडेमोड तयार नव्हती. मन धजावत नव्हतं. भविष्याचं ओझं जड वाटत होतं. मी कुणालचा हात पकडला आणि हसत म्हटलं “उडी मारली की पोहायला येतंच. त्यादिवशी रात्रभर आम्हाला झोप लागली नाही ,खूप भीती वाटत होती. कुणालला तर खूप जास्त भीती वाटत होती पण मला स्वप्नावर विश्वास होता.आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला भीतीपेक्षा मोठं आपलं स्वप्न आहे. Risk घ्यायची हिंमत असेल,तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं”.

आणखी वाचा – ‘सालबर्डी’ गाण्यातील गोंधळाची चर्चा, गश्मीर महाजनीचं अंगावर शहारे आणणारं हे गाणं, आशिष पाटीलच्या नृत्यदिग्दर्शनाचं कौतुक

शेवटी तिने असं लिहिलं आहे की, “आज या चाव्या हातात आहेत आणि मनात एकच भावना या पृथ्वीवर आमची स्वतःची एक जागा आहे. छोटी असेल पण आमची आहे. आणि ती आम्ही दोघांनी उभी केली आहे. अभिमान पैशांचा नाही. अभिमान आहे त्या प्रवासाचा. जर तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा. उशीर झाला तरी चालेल पण जिद्द जिवंत ठेवा. कारण घर जिद्दीने बांधलं जातं. त्या दिवशी मी Antilia कडे बघत होते, आज मी माझ्या Antilia मध्ये उभी आहे”.

Tags: ankita walawalkarbigg boss marathinew home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
The Maharashtra Files Marathi Movie
Entertainment

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर

मे 29, 2026 | 12:00 pm
shashank shende role in ghabadkund
Entertainment

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूकची चर्चा

मे 28, 2026 | 10:01 am
veteran actor ramakant dayama death
Entertainment

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६५व्या वर्षी निधन, सहकलाकाराची भावुक पोस्ट

मे 26, 2026 | 2:16 pm
Next Post
divyanka tripathi news

लग्नाच्या १० वर्षांनी सुप्रसिद्ध जोडपं होणार आई-बाबा, फोटो शेअर करत दाखविली झलक, अभिनेत्री 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.