प्रत्येक महिलेला नटायला, तयार व्हायला खूप आवडतं. सुंदर, छान असा ड्रेस, साडी परिधान करायला सगळ्याच महिलांना आवडतं. सध्या तर सर्वत्र लग्नाचा सीझन सुरु आहे. त्यामुळे बऱ्याचशा महिला साडी नेसण्याला प्राधान्य देतात. मात्र प्रश्न असतो तो मॅचिंग ब्लाऊजचा. हे ब्लाऊज कसे असावेत? चांगले ब्लाऊज परवडतील अशा दरात कुठे मिळतील? त्याचप्रमाणे ब्लाऊजमध्ये वेगळ्या व्हरायटी कुठे मिळतील? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. या सगळ्यावर आता आपण सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच या ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या कापडामध्ये हे ब्लाऊज कुठे आणि कशा दरात मिळतील? याबद्दल जाणून घेऊया. (Readymade Blouse)
साडी नेसायची म्हणजे ब्लाऊज कोणता घालायचा? असा मोठा प्रश्न सगळ्याच महिलांसमोर उभा राहतो. एका ब्लाऊजची शिलाइ नाही म्हंटली तरीही १००० रुपये होतेच. पण एवढे पैसे देऊनदेखील तुम्हाला हवा तसा ब्लाऊज मिळेल की नाही? हा प्रश्न समोर येतोच. पण दादरमध्ये अशी एक जागा आहे जिथे तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त असे ब्लाऊज मिळू शकतील.
आणखी वाचा – ‘आठवी-अ’ व ‘पाऊस’च्या भरघोस यशानंतर लवकरच नवी वेबसीरिज येणार, मुहूर्त सोहळा संपन्न
दादर पूर्व येथे अशी एक जागा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्त असे रेडीमेड ब्लाऊज मिळतील. या ठिकाणी सुंदर, तसेच प्लस साईजमध्ये ब्लाऊज उपलब्ध आहेत. डिझायनर, ब्राइडल, पूजा, इतर कार्यक्रमासाठी स्पेशल असे ब्लाऊज तुम्हाला इथे मिळतील. ब्लाऊजची किंमत ३०० रुपयांपासून ब्लाऊज तुम्हाला मिळू शकतील. या ठिकाणी तुम्हाला हवे तसे ब्लाऊज मिळतील. विशेष म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्लस साईजदेखील उपलब्ध होतील.
दरम्यान आता तुम्हाला ब्लाऊज घ्यायचे असतील तर दादर पूर्व येथे शॉप नंबर २, ७६/८६ , मिठावाला चाळ, डी. एस. पी. रोड, दादर या पत्त्यावर जाऊन विकत घेऊ शकता. त्यामुळे आता रेडीमेड ब्लाऊजची स्वस्तात मस्त खरेदी करायची तर वेळ न घालवता त्वरित या ठिकाणी संपर्क साधा.