‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर आहे. मालिकेच्या कथानकाच्या जोरावर आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने ही मालिका प्रेक्षकवर्गात लोकप्रिय आहे. या मालिकेतील सायली-अर्जुन या पात्रांना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. इतकंच नव्हे तर या मालिकेतील इतरही पात्रे घराघरात पोहोचली आहेत. मालिकेतील नकारात्मक भूमिकांनाही प्रेक्षक पसंती दर्शवित आहेत. (Ketki palav daughter)
या मालिकेतील साक्षी या पात्राचा प्रेक्षक रागराग करताना दिसत आहेत. आजवर साक्षीच्या वागणुकीने इतरांना त्रासच झाला आहे त्यामुळे मालिकेतील हे पात्र फारसं कुणाला आवडेल दिसत नाही. साक्षी ही भूमिका मालिकेत आधी मीरा जगन्नाथ हिने साकारली होती. मीराच्या एक्झिटनंतर अभिनेत्री केतकी पालवने तिची जागा घेतली. केतकीने साक्षी म्हणून प्रेक्षकांचे मन जिंकले. छोट्या पडद्यासह केतकीने रंगभूमीवरही बरंच काम केलं आहे.
अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही केतकी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत असते. फार कमी लोकांना ठाऊक असेल की केतकीला पाच वर्षांची लेक आहे. केतकीने तिच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. केतकीच्या नवऱ्याचे नाव गंधार पटवर्धन असून तिच्या लेकीचे नाव ईश्वरी असे आहे. केतकीने शेअर केलेल्या फोटोंवरुन तिचं लेकीबरोबर असलेलं खास बॉण्डिंग पाहायला मिळतं. केतकी तिच्या कुटुंबाबरोबर बरेचदा योगसाधना करताना दिसते.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील केतकी या पात्राबद्दल बोलायचे झाले तर, केतकीने चैतन्यला जाळ्यात ओढत स्वतःची सुटका करण्यासाठी त्याचा वापर केला. मात्र साक्षीचा खरा चेहरा हा अर्जुन व चैतन्यसमोर आला. मात्र आता साक्षी अर्जुन-चैतन्य विरोधात नवा डाव आखत त्यांना संकटात पाडण्यासाठी धडपड करत आहे.





