‘पारू’ या मालिकेला सध्या विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेत पारू व आदित्य यांचं ऍडशूटसाठीचं लग्न पार पडलेलं पाहायला मिळालं. मालिकेत पारूभोवती फिरणार कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. पारू या गावाकडील मुलीचा प्रवास मालिकेत पाहणं रंजक ठरतोय. तर पारु मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारताना दिसत आहे. तर आदित्यची भूमिका अभिनेता प्रसाद जवादे साकारताना दिसत आहे. (paaru and gani reel video)
मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी घरापासून दूर सातारा येथे राहून चित्रीकरण करत आहेत. या मालिकेमुळे शरयूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शरयू सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अनेकदा ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवत ती पोस्टही करताना दिसते.
काही दिवसांपूर्वीच शरयू व पूर्वाचा ‘ए कांचन’ या ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स बराच व्हायरल झालेला पाहायला मिळाला. यानंतर आता शरयू म्हणजेच पारू व गणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही कलाकार मंडळी चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत सेटवर मजा, मस्ती, डान्स करतात आणि त्यांचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअरही करतात. अशातच पारू व गणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस” हे गाणं काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिगवर आहे. अशातच ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणे आणि गणीची भूमिका साकारणारा देवदत्त घोणे यांनादेखील या ट्रेंडिंग गाण्यावर रील करण्याचा मोह आवरला नाही. या व्हिडीओत पारू लग्नाच्या शूटसाठी तयारी झालेली दिसत आहेत तर देवदत्त त्याच्या गणीच्या भूमिकेतील कपड्यांमध्ये आहे. पारू व गणीचं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून नेटकरी भरभरुन कमेंट करताना दिसत आहेत.