‘कलर्स मराठी’वरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘काव्यांजली’. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. या मालिकेत अंजली व काव्या या दोन बहिणींच्या अतूट नात्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या मालिकेला व मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
कलर्स वाहिनीवर लवकरच दोन नवीन मालिका येणार आहेत. नुकतंच या मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आले असून यापैकी एका मालिकेचे नाव ‘अबीर गुलाल’ आहे, तर दुसऱ्या मालिकेचं नाव ‘अंतरपाट’ असं आहे. त्यामुळे या दोन मालिकांमुळे काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे आणि या जुन्या मालिकेमध्ये ‘काव्यांजली’ ही मालिका असल्याच्या चर्चा सध्या रंगताना दिसत आहेत. अशातच या मालिकेतील एका मुख्य अभिनेत्याने याविषयीची सूचक माहीती दिली आहे.
आणखी वाचा – शाब्बास पोरी!, आधी घर आणि आता गाडी, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीकडून आई-वडिलांना पुन्हा एकदा खास सरप्राइज
‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजित ही भूमिका साकारत पियुषने प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत पियुषची महत्त्वपूर्ण भूमिका असून त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतानाचे पाहायला मिळाले. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर मालिकेसंबंधित माहितीही शेअर करत असतो. त्यामुळे त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पियुषने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर करत “विश्वजितचे काही शेवटचे दिवस” असं म्हणत त्याने “कृतज्ञतेची भावनाही व्यक्त केली आहे. त्यामुळे त्याच्या या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे त्याची विश्वजित ही भूमिका असणारी ‘काव्यांजली’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहे. अर्थात मालिका संपण्याबाबत कलर्स वाहिनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण पियुषच्या या स्टोरीवरुन हे मालिका संपणार आहे असे दिसत आहे.