अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बॉलिवूडच्या नामांकित कलाकारांनी आणि अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी गरोदर असलेल्या दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगबरोबर शाही लग्नाला हजेरी लावली आणि खूप एन्जॉय केलं. पण सर्वांच्या नजरा कतरिना कैफवर वळल्या. कतरिना अनंत व राधिकाच्या संगीत, मेहंदी व हळदी समारंभांपासून दूर राहिली होती. यावेळी फक्त विकी कौशलने हजेरी लावली होती. कतरिना कैफ प्रेग्नंट आहे आणि त्यामुळेच ती लोकांना टाळत आहे, अशी अफवाही सर्वत्र होती. (katrina kaif pregnent)
विकीला विचारले असता त्याने कतरीना बाहेर गेली असल्याचे सांगितले. पण आता कतरीना राधिका व अनंतच्या लग्नाला पोहोचली. तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले.अनंत व राधिकाच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत, ज्यामध्ये चाहत्यांना कतरिना कैफचा बेबी बंप पाहायला मिळत आहे. यामुळे चाहत्यांच्या आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे यावेळी कतरिनाने आपला बेबी बंप लपवण्याचाही प्रयत्न केला नाही.
लाल रंगाच्या साडीत कतरिनाचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता आणि कतरिनाने विकी कौशलसह अनेक पोजही दिल्या आणि लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी पापाराझींना शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे आलिया भट्टनेही पती रणबीर कपूरबरोबर एन्ट्री केली आणि सर्वांनाच अभिनेत्रींच्या या लूकने वेड केलं. यावेळी आलिया भट्ट एखाद्या राजकन्येपेक्षा कमी दिसत नव्हती. ती राधिका आणि अनंतच्या लग्नात १६० वर्षे जुनी साडी परिधान करुन पोहोचली होती. सोशल मीडियावरही आलियाचे खूप कौतुक होत आहे. त्याचवेळी कतरिनाला पाहून चाहत्यांच्या आनंदालाही सीमा नव्हती. एका चाहत्याने लिहिले, “अरे वा, ती प्रेग्नंट आहे”. तर आणखी एका चाहत्याची प्रतिक्रिया होती, “ही फॅशन व स्टाइल आहे. शिकायचे असेल तर कतरिनाकडून शिका”.
कतरिना कैफच्या गरोदरपणाची बातमी पहिल्यांदा समोर आली जेव्हा तिचा पती विकी कौशलबरोबरचा एक व्हिडीओ लंडनमधून समोर आला. त्यात ती ओव्हरसाईज जॅकेट घालून रस्त्यावर फिरताना दिसली. यानंतर, काही दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत होता. मात्र, याविषयी विकी कौशलला विचारले असता, जेव्हा कोणतीही चांगली बातमी येईल तेव्हा तो स्वतः सर्वांना सांगेन, असे सांगितले होते. अद्याप दोघांनी या चर्चांवर मौन सोडले नाही.