सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 12, 2025 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vaama Ladhai Sanmanachi

मराठीत 'वामा - लढाई सन्मानाची' चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

Vaama Ladhai Sanmanachi : स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा लढाई सन्मानाची’ हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपासून स्त्री शक्तीला योग्य पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यांत अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडणारा दिसला. यानंतर ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटातील टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून, रसिकांमध्ये आता या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध गायक कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांच्या जोशपूर्ण आवाजात सादर करण्यात आलेले हे गीत मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले असून रिजू रॉय यांचे जबरदस्त संगीत या गाण्याला लाभले आहे. हे गाणे म्हणजे सन्मानासाठी लढणाऱ्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे. या गाण्यातून केवळ संघर्षच नाही तर एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. ‘वामा लढाई सन्मानाची’ या गाण्याचे बोल अतिशय शक्तिशाली असून ते संघर्ष, आत्मगौरव आणि नारीशक्तीच्या उभारणीचे दर्शन घडवतात. चित्रपटाच्या आशयाला साजेसे असे हे टायटल साँग स्त्रीच्या संघर्षाची आणि सन्मानासाठीच्या लढाईची तीव्रता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.

आणखी वाचा – Video : बायकोला मंगळसूत्र घालताना भर मंडपात रडला अक्षय केळकर, अश्रूच थांबेनात अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Majja Official (@its.majja)

गाण्याबद्दल गायक कैलास खेर म्हणतात, ”हे टायटल साँग इतके ऊर्जेने भरलेले आहे, की ते ऐकताना आपसूकच एक बळ मिळते. या गाण्याचे बोल प्रत्येक स्त्रीला बुद्धिमान, निर्भय आणि जिंकण्यासाठी सज्ज करणारे आहेत. हे गाणे खरंतर महिलांच्या सक्षमीकरणाचे ब्रीदगीत आहे, असे म्हटले तरी चालेल”. तर दिग्दर्शक अशोक कोंडके म्हणतात, ”कैलास खेर, मंजिरी गांगुली यांचा दमदार आवाज, संगीताची लयबद्धता आणि शब्दांतील स्फूर्ती एकत्र येऊन बनलेले हे टायटल साँग एक संस्मरणीय अनुभव देणारे आहे. या प्रेरणादायी गाण्यात लढ्याचा, आत्मसन्मानाचा आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा झणझणीत संदेशही आहे. मला खात्री आहे, हे गाणे प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल”.

आणखी वाचा – बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत?, जावेद अख्तर म्हणाले, “ईडी, सीबीआय पाठी लागली तर…”

ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tags: marathi moviemarathi songnew movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

handicap couple love story
Social

Video : अपघातात गमावले दोन्ही हात, तरीही गर्लफ्रेंडने केलं लग्न; सात वर्षांच्या प्रेमाला घरातून विरोध असताना…

मे 12, 2025 | 6:33 pm
Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Next Post
Rakesh Poojary Death

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.