बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहा वर्षांमध्ये दोनवेळा घटस्फोट, बिपाशा बासूबरोबर तिसऱ्यांदा थाटला संसार, आता करण ग्रोव्हर म्हणतो, “वाईट गोष्टींबाबत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 21, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Karan Singh Grover personal life

सहा वर्षांमध्ये दोनवेळा घटस्फोट, बिपाशा बासूबरोबर तिसऱ्यांदा थाटला संसार, आता करण ग्रोव्हर म्हणतो, "वाईट गोष्टींबाबत..."

छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारा अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आज बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतो. यावर्षी प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन व दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’ या चित्रपटातही तो दिसला होता. करणने या चित्रपटात सरताज गिलची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. करणच्या या भूमिकेचं बरंच कौतुकही झालं. करण सिंग ग्रोव्हर त्याच्या कामासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अशातच अभिनेत्याने दोन्ही घटस्फोटांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असल्याचं पाहायला मिळत आहे. (Karan Singh Grover personal life)

करण सिंग ग्रोवरने २०१६ मध्ये बिपाशा बासूसह लग्न केले. सध्या करण बिपाशाबरोबर सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. पण बिपाशापूर्वी करणने अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटबरोबरही लग्न केले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. करणने त्याच्या भूतकाळाबद्दल कधीही खुलासा केला नव्हता. आता मात्र त्याने या त्याच्या भूतकाळावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – Video : देशमुखांच्या सूनेने जपली परंपरा, जिनिलीया देशमुखने खास अंदाजात साजरी केली वटपौर्णिमा, म्हणाली, “माझंही आयुष्य तुला…”

‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, “ब्रेकअप किंवा घटस्फोट यात काहीही चांगले नाही. मात्र नंतर जेव्हा लोक पुढे जातात तेव्हा त्यांना समजते की ते चांगल्यासाठीच घडले आहे. आणि ते छानही आहे पण माझ्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टींबाबत मला कोणाशीही बोलण्याची गरज कधीच वाटली नाही कारण लोक येऊन आयुष्यात चाललेल्या वाईट गोष्टींबाबत काही बोलतील अशी माझी अपेक्षाही नाही”. पुढे करण म्हणाला, “हा माझा मुख्य उद्देश नाही. मला काहीसा प्रेम व आनंद पसरवायचा आहे. प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील स्वतःच्या विकृतीला सामोरे जावे लागते आणि मला वाटते की प्रत्येकजण त्यांच्यातील विकृतीसारख्या वैयक्तिक गोष्टी सांभाळण्यासाठी सक्षम आहेत”.

आणखी वाचा – ‘पारू’ने खऱ्या आयुष्यात साधेपणाने साजरी केली वटपौर्णिमा, दिसते इतकी सुंदर, नवऱ्यासह फोटोही काढला, व्हिडीओ चर्चेत

करण सिंग ग्रोवरने २००८ मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमबरोबर पहिले लग्न केले. जवळपास वर्षभरानंतर दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर करणने २०१२ मध्ये जेनिफर विंगेटशी लग्न केले, पण हे नातेही फार काळ टिकले नाही आणि २०१४ मध्ये ते दोघे वेगळे झाले. यानंतर त्याने बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूशी लग्न केले आणि ते त्यांची लेक देवीचे आई-वडील झाले.

Tags: bollywood actorkaran sing grover marriagekaran singh groverKaran Singh Grover personal life
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Aishwarya Narkar

"तुमचं ब्रेकअप झाला होता का?", ऐश्वर्या नारकरांना चाहत्याने विचारला खासगी प्रश्न, म्हणाल्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.