शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘जवान’ फेम दिग्दर्शकाची कपिल शर्माने रंग-रुपावरुन उडवली होती खिल्ली, ट्रोल झाल्यानंतर आता दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “उगाच…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 18, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kapil Sharma gave reaction after racist comment on atlee in The Great Indian Kapil Show

‘जवान’ फेम दिग्दर्शक अॅटिलीची रंग-रुपावरुन खिल्ली उडवल्यानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया समोर

कॉमेडीयन कपिल शर्मा आपल्या ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींबरोबर विनोद करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या शोमध्ये येणाऱ्या अनेक सेलिब्रेटींबरोबर तो मजामस्ती करत असतो. या शोमध्ये सहभागी होणारे सेलिब्रिटीही याचा आनंद घेत असतात. मात्र या शोमध्ये नुकतीच ‘बेबी जॉन’ या चित्रपटाची टीम पोहोचली होती. यावेळी कपिलने चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटलीवर वर्णभेदी टिप्पणी करत त्याची मस्करी केली होती. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नुकत्याच झालेल्या या भागाची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kapil Sharma reaction on tlee racist comment)

या व्हिडीओत कपिल ॲटलीला असं म्हणतो की, “तुम्ही कधी कोणत्या मोठ्या कलाकाराला भेटायला गेलात आणि त्यांनी ओळखलं नाही असं कधी झालं आहे का?”. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तर ॲटलीच्या काही चाहत्यांनीही कपिल शर्मावर नाराजी व्यक्त केली आहे. अशातच या संपूर्ण प्रकरणावर आता स्वत: कपिलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तीन दिवसांनंतर लोकांना द्वेष पसरवू नका असं म्हणत या वादावर मौन सोडलं आहे.

Dear sir, can you pls explain me where n when I talked about looks in this video ? pls don’t spread hate on social media 🙏 thank you. (guys watch n decide by yourself, don’t follow any body’s tweet like a sheep). https://t.co/PdsxTo8xjg

— Kapil Sharma (@KapilSharmaK9) December 17, 2024

आणखी वाचा – धर्म बदलण्यासाठी एजाज खानची पवित्रा पुनियावर जबरदस्ती?, अभिनेत्री म्हणाली, “मुस्लिम मुलीने हिंदू घरात…”

ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कपिलने प्रतिक्रिया देत असं म्हटलं आहे की, “प्रिय सर, या व्हिडीओमध्ये मी त्याच्या लूकबद्दल कधी आणि कुठे बोललो? हे तुम्ही मला समजावून सांगू शकता का? कृपया सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका. मित्रांनो, तुम्हीच बघा आणि ठरवा, उगाच मेंढरासारखे कोणाच्याही ट्विटला फॉलो करू नका”. कपिलच्या या प्रतिक्रियेवरही आता नेटकऱ्यांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – हॉस्पिटलमधून परतल्यावर हिना खानची ‘अशी’ झाली आहे अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली, “माझ्या हृदयाचे…”

सोशल मीडियावर सध्या कपिल शर्माला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कुणी कपिलचे समर्थन केले आहे, तर काहींनी पुन्हा त्याच्यावर टीका केली आहे. “आता राहू द्या”, “तुम्ही चुकीचेच बोललात असे बोलायला नको होते”, “कपिल सर त्यांच्या लूकबद्दल बोलत नाहीत तर त्यांच्या वयाबद्दल बोलत आहेत”, “तुमचा प्रश्न स्वतःच वर्णद्वेषी होता”. अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी कपिलवर पुन्हा टीकेची तोफ डागली आहे.  

Tags: kapil sharmakapil sharma comedyKapil Sharma reaction on tlee racist comment
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Eijaz Khan Reaction  Pavitra Punia

एजाज खानने धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती केल्याचा पवित्रा पुनियाचा आरोप फेटाळला, अभिनेत्याच्या घरीही तणावाचं वातावरण, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.