अभिनेत्री कंगना रणौत अभिनय क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासह ती सामाजिक मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडताना दिसते. कंगना रणौत अनेकदा देशात घडणाऱ्या घटनांवर आपली भूमिका मांडताना दिसते. एकंदरीत कंगनाच्या राजकारणावरील वक्तव्यावरून ती राजकारणात येणार असल्याचा अंदाजही वर्तवला जात होता. कंगना २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या. यावर अखेर अभिनेत्रीच्या वडिलांनी मौन सोडले आहे. (Kangana Ranaut Loksabha Election 2024)
गेल्या अनेक महिन्यांपासून अशी अफवा होती की, कंगना रणौत २०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार आहे. याबाबत थेट अभिनेत्रीच्या वडिलांनी अपडेट शेअर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौतचे वडील अमरदीप असं म्हटलं आहे की, अभिनेत्री भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर पुढील वर्षी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. अमरदीप रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ” कंगना भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार आहे”.
आणखी वाचा – “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ
कंगना रणौतच्या वडिलांनी निवडणूक कुठून लढवायची याचा निर्णय पक्ष घेईल, असे स्पष्ट केले आहे. रविवारी कंगना रणौतने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू येथील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
यांत भर घालत कंगना पुढील वर्षी निवडणूक लढवणार असल्याचे तिच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, कंगना ऍक्शन फिल्म ‘तेजस’ मध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. यानंतर ती आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता आता हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित होणार आहे.