पंगाक्वीन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतीच कंगनाने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली. कंगनाला नुकतीच चंदीगड विमानतळावर CISF सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरने कानशिलात लागावळी. या घटनेनंतर महिला रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी मोहाली पोलिसांनी कंगनाला थप्पड मारल्याप्रकरणी कुलविंदरविरुद्ध एफआयआरही नोंदवला.
यानंतर अनेकांनी कुलविंदरविरुद्ध अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. यामध्ये कुणी तिच्या विरोधात म्हटले आहे तर कुणी तिच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र यामध्ये तिला समर्थन देणाऱ्या प्रतिक्रिया अधिक असल्याचे दिसून येत आहे. कंगनाला थप्पड मारल्याचा आरोप असलेल्या कुलविंदरला अनेक लोक आणि संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. तसेच अनेकांनी तिला अटक किंवा सेवेतून बडतर्फ झाल्यास आर्थिक आणि कायदेशीर मदत देण्याबाबतही बोलले आहे.

कुलविंदरच्या समर्थनार्थ पुढे आलेल्यांमध्ये ८२ वर्षीय शेतकरी कार्यकर्ते मोहिंदर कौर यांचाही समावेश आहे. मोहिंदर कौर यांनी “कंगनाला कसे बोलावे हे समजत नाही. तिने पंजाबींना अतिरेकी म्हणण्याचा प्रयत्न केला. ती खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तिने विनम्र असले पाहिजे” असं म्हटलं आहे. तर बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल ददलानी यांनीही कंगनाला थप्पड मारणाऱ्या कॉन्स्टेबलचे समर्थन करत तिला नोकरी देणार असल्याची पोस्ट लिहिली होती.
विशालने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी हिंसेचे समर्थन करत नाही. पण मी त्या महिलेची अवस्था समजू शकतो. मी वचन दिले आहे की, मी हिंसेचे कधीही समर्थन करत नाही. पण मी कुलविंदर यांचा राग व गरज समजू शकतो. जर या प्रकणामुळे त्यांची नोकरी गेली तर मी त्यांना नोकरी देईन. जय हिंद. जय जवान जय किसान”
आणखी वाचा – नेत्रा-अद्वैतच्या मदतीने रुपालीचा पुन्हा राजाध्यक्षांच्या घरात प्रवेश, विरोचकाची नवीन खेळी यशस्वी होणार का?
दरम्यान, चंदीगढ विमानतळावर सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षक कुलविंदर कौरने कंगणाच्या कानाखाली लगावली. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकरणाची सध्या खूपच चर्चा होत आहे. या सीआयएसएफ महिला कर्मचारी कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले असून कुलविंदर कौर विरुद्ध आयपीसीच्या जामीनपात्र कलम ३२३ आणि ३४१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे