बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई; घरी चिमुकल्या परीचं आगमन; पोस्ट शेअर करत म्हणाली, “१० मार्चला मुलीचा जन्म…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2026 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actress Become Mother

‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई

Marathi Actress Become Mother : मराठी मालिकांच्या विश्वात आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई कल्याणकर हिच्या आयुष्यात सध्या आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. ‘कमळी’ मालिकेत राधिकाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली सई आता आई झाली असून तिच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. १० मार्च २०२६ रोजी तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी सईने काही दिवसांनी, म्हणजेच बाळाच्या जन्मानंतर जवळपास दोन आठवड्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली.

सोशल मीडियावर तिने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आमच्या आयुष्यात छोट्या परीचं आगमन झालं आहे. १० मार्च हा दिवस आमच्यासाठी खास ठरला. आता आयुष्याचा एक सुंदर आणि नवीन प्रवास सुरू झाला आहे,” असे भावनिक शब्द तिने लिहिले. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये बाळाच्या छोट्या हातांची झलक पाहायला मिळत आहे. ही गोड बातमी समजताच चाहत्यांनी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी सईवर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘कमळी’ मालिकेतील सहकलाकारांनीही तिच्या पोस्टवर प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे मुख्य अभिनेत्री विजया बाबर हिने “सई आई” अशी मनापासून कमेंट करत तिचं अभिनंदन केलं.

View this post on Instagram

A post shared by Sai Kalyankar (@saisudhirkalyankar)

आणखी वाचा – दिव्यांका त्रिपाठीच्या पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री होणार आई, फोटो शेअर करत म्हणाली, “नवीन सुरुवात…”

सईच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर डिसेंबर २०२१ मध्ये तिने प्रशांत चव्हाण यांच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांच्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण चार वर्षांनंतर आला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ आणि ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ यांसारख्या मालिकांमधून सईने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता तिच्या आयुष्यात आईपणाची नवी भूमिका सुरू झाली असून, चाहत्यांकडून तिच्या या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

आणखी वाचा – घटस्फोटाच्या ६ वर्षांनंतर बादशाह अडकला लग्नबंधनात, ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी

Tags: marathi actressMarathi Actress Become Mothermarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
anurag dobhal health update

अपघातानंतर 'बिग बॉस' फेम युट्युबरचा उजवा पाय सुन्न, चालता येणं झालंय कठीण, प्रकृती गंभीर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.