स्पर्धेच्या युगात पुढे जाण्यासाठी गरज असते ती मेहनतीची, अपार कष्टांची मग क्षेत्र कोणतंही असोया दोन गोष्टींना पर्याय अजून उपलब्ध नाहीत. या दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये योग्य वाट दाखवणारा मिळाला कि मेहनत करायला लागणारी सकारात्मक ऊर्जा मिळते. वाट दाखवणारा योग्य व्यक्तीचा सहवास जरी लाभला तरी योग्य दिशेने जाण्यासाठी करावी लागणारी मेहनत व्यर्थ वाटत नाही.(Utkarsh Shinde post viral)
असच काहीस घडलंय मराठी इंडस्ट्रीत नव्याने एन्ट्री झालेल्या दोन अभिनेत्यांसोबत ज्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा किंवा ड्रीम प्रोजेक्ट असेल असं म्हणाल्या हरकत नसलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्या साठी ते घेत असलेले मेहनत आणि त्यांनी गुरुस्थानी मानलेल्या गुरूंची माहिती त्यांनी शेअर केली आहे. तर गुरु शिष्यांच्या या जोडीचं नाव आहे अभिनेता जय दुधाने , उत्कर्ष शिंदे आणि मराठी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते, दिगदर्शक महेश मांजरेकर.
हे देखील वाचा- गौरीच्या आठवणीत हरवलेल्या यशचा अपघात? आई कुठे काय करते मालिकेत येणार नवीन वळण?
काय आहे कलाकारांची पोस्ट(Utkarsh Shinde post viral)
महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जय दुधाने आणि उत्कर्ष शिंदे या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जय आणि उत्कर्षने त्यांचा जिम मध्ये वर्कआउट करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्या मध्ये दोघां सोबत स्वतः महेश मांजरेकर त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
तर उत्कर्ष ने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे ‘ “कैप्टन ऑफ द शिप “ महेश मांजरेकर सर जेव्हा जिम मध्ये येतात .तेव्हा दिवस भर रण रणत्या उन्हात,कधी घोडेस्वारी,तलवार बाजीचे सिन देऊन दमलेले आम्ही सर्व त्यांच्या येण्याने डबल जोशात व्यायाम करू लागतो .माझ्या साठी हे शूटिंग आयुष्यालासमृद्ध करणार आहे.प्रवीण तरडे दादा सारखा मोठा दिग्दर्शक ,लेखक मोठ्या भावा प्रमाणे सदैव सोबत,त्यांच्या अनुभवाचे स्ट्रगल चे किसे खूप काही शिकवून जातायेत. ह्यांच्या कडून होणाऱ्या प्रेमच्या आशीर्वादाच्या वर्षावात उत्कर्षचा उत्कर्ष होतोय'(Utkarsh Shinde post viral)
हे देखील वाचा- आदिपुरुष चित्रपटात झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता

तर जय ने पोस्ट केलेल्या व्हिडिओ कॅप्शन देत म्हणले आहे ‘ आजचा वर्कआउट गुरु स्थानी असलेल्या दोन महत्वाच्या व्यक्तींसोबत.’ या व्हिडिओ मध्ये महेश मांजरेकर आणि प्रवीण तरडे जयला मार्गदर्शन करताना दिसत आहेत. वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या बऱ्याच वादानंतर हा चित्रपट आता पुढची भूमिका घेत आहे. या चित्रपटात जय आणि उत्कर्ष यांच्या सोबतच सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी आणि इत्यादी कलाकार दिसत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका अभिनेता अक्षय कुमार साकारत आहे.