क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटी सामन्यातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत विराटने याबाबत माहिती दिली. त्याच्या या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विराटने खूप लवकर कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतली असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. तर अनुष्का शर्माने विराटला पाठिंबा देत भावुक पोस्ट शेअर केली होती. विराट कसोटी सामने खेळणार नाही म्हटल्यावर त्याचे चाहतेही नाराज झाले. कलाक्षेत्रातूनही विराटबाबत विविध प्रतिक्रिया समोर आल्या. आता जावेद अख्तर यांनी विराटच्या निवृत्तीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. (javed akhtar about virat kohli retirement)
जावेद यांनी विराटबाबत मत मांडताच त्यांना अनेकांनी कमेंट्सद्वारे सुनावलं आहे. विराटवर नाराज असल्याचं जावेद यांनी म्हटलं. ते म्हणाले, “विराटला अधिक माहिती आहे हे जगजाहिर आहे. कसोटी सामन्यातून अशावेळी त्याने निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर चाहता म्हणून मी त्याच्यावर नाराज आहे. मला असं वाटतं की, त्याच्या मनात अजूनही क्रिकेट आहे. मी त्याला मनापासून विनवणी करतो की, या निर्णयावर विराटने पुन्हा एकदा विचार करावा”.
आणखी वाचा – बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’
Obviously Virat knows better but as an admirer of This great player I am disappointed by his rather premature retirement from Test cricket cricket . I think there is still a lot of cricket in him . I sincerely request him to reconsider his decision.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 14, 2025
जावेद यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तो शाहिद आफ्रिदी नाही की, २० वेळा कमबॅक करेल, तो एक प्रामाणिक क्रिकेटर आहे, त्याने पुन्हा त्याच्या निर्णयावर विचार करावा असं आम्हालाही वाटत आहे पण ते शक्य नाही, जावेद साहेब तुम्ही बरोबर बोललात पण तुमचं मत आम्ही ग्राह्य धरत नाही. अशा कमेंट जावेद यांच्या पोस्टवर अनेकांनी केल्या आहेत.
दरम्यान विराटबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर काहींनी जावेद यांच्या मताला सहमती दर्शवली आहे. विराट निवृत्तीनंतर त्याच्या कुटुंबियांना अधिकाधिक वेळ देणार आहे. त्याला जगभर फिरण्याचीही इच्छा आहे. तसेच विराट आता पत्नी अनुष्कासह अध्यात्मिक मार्गाकडे वळला आहे. निवृत्तीच्या निर्णयानंतर प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनासाठी विराट-अनुष्का गेले होते. तिथे त्यांनी अध्यात्मिक संवाद साधला. यावेळी विराट-अनुष्का भावुक झाले होते.