मंगळवार २२ एप्रिल संपूर्ण देशासाठीच काळा दिवस ठरला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि यावेळी २६ जणांनी आपला जीव गमावला. यामध्ये तरुण पर्यटकांचाही समावेश होता. निसर्गात हरवून गेलेल्या ठिकाणी सुट्टी एन्जॉय करत असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पण या संपूर्ण घटनेमध्ये तेथील काही स्थानिक लोक पर्यटकांसाठी देवमाणूस ठरले. पर्यटकांना मदत करत असताना २० वर्षीय घोडेवाला सय्यद आदिल शाहाचा मृत्यू झाला. गोळीबार करु नका असं तो दहशतवाद्यांना म्हणत असतानाच सय्यदलाच मारण्यात आलं. त्याचं हे धाडस व कतृत्त्वाला सलामाच… सय्यदबरोबरच आणखी एक लहान काश्मीरी मुलगा पर्यटकांसाठी हिरो ठरला. त्याच्याची सध्या चर्चा सुरु आहे. (pahalgam terror attack viral video)
पहलगाम हल्ल्यातील बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामधील एक व्हिडीओ माणूसकीचं दर्शन घडवणारा ठरला. एकीकडे माणसातल्या राक्षसांचं दर्शन पर्यटकांना घडत होतं, तर दुसरीकडे माणसातला देव मदतीला धावून येत होता. सोशल मीडियायावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक काश्मीरी मुलगा लहान मुलाला उचलून धावत येताना दिसत आहे. तसेच गोळीबाराचा आवाजही यामध्ये येत आहे.
आणखी वाचा – मॅगी खाताना नवऱ्याला मारलं, ते पाहून पत्नीने दहशतवाद्यांकडे मरण मागितलं अन्…; पहलगाममध्ये नववधूने फोडला टाहो
पाहा व्हिडीओ
A Kashmiri boy carried a tourists small baby in his Arms and saved him during the Phalgam attack. But no media will show it .#PahalgamTerrorAttack pic.twitter.com/Y58VuV5UhU
— 🎀🎀. (@Kaakazkyom) April 25, 2025
गोळीबार सुरु असताना काश्मीरी मुलाने लहान बाळाला उचलून घेत एकच वाट धरली. गोळीबाराचा आवाज वाढला तसा त्याचा धावण्याचा वेगही वाढत होता. इतर काही पर्यटक व्हिडीओमध्ये घोड्याने डोंगर उतरताना दिसत आहेत. तर काही महिला जीव वाचवण्याच्या हेतून ओरडत आहेत. ही भयंकर घटना व्हिडीओमध्ये पाहूनच अंगावर काटा येतो. मात्र काश्मीरी मुलाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियाद्वारे हा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून त्याचं कौतुक होत आहे.
पहलगाम हल्लाचे जे साक्षीदार होते त्यांनी तिथल्या घटनेची संपूर्ण परिस्थिती सांगितली. धर्म विचारुन केलेला गोळीबार, फक्त पुरुषांनाच टार्गेट या सगळ्या गोष्टी यामधून समोर आल्या. इतकंच नव्हे तर काश्मीरच्या वाढत्या पर्यटनामुळे हा हल्ला झाला असावा असा अंदाजही वर्तवला जात आहे. कारण काहीही असो मात्र अशापद्धतीने निष्पाप लोकांना जागीच ठार करणं आयुष्यभरासाठी जखम देणारं आहे. या राक्षसांना योग्य ती शिक्षा कधी मिळणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.