शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘जय संतोषी माँ’ या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन, वयाच्या ८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 20, 2024 | 2:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jai Santoshi Maa popular movie producer Dada Satram Rohra passed away know more

'जय संतोषी माँ' या गाजलेल्या चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन, वयाच्या ८५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय संतोषी मां’ या सुपरहिट व रेकॉर्डब्रेक चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १८ जुलै गुरुवार रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दादा सतराम रोहरा हे सिंधी समाजातील मोठे नाव होते. रेडिओ सिंधीने इन्स्टाग्रामवर सतराम रोहरा यांच्या निधनाची माहिती दिली. आजोबा सतराम रोहरा हेही गायक होते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली होती, ज्यात ‘जय संतोषी मां’ आणि ‘हाल ता भाजी हालूं’ सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

रेडिओ सिंधीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “प्रसिद्ध गायक व चित्रपट निर्माते दादा सतराम रोहरा यांचे १८ जुलै २०२४ रोजी निधन झाल्याचे कळवताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. त्यांच्या महान आत्म्याला शांती लाभो आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो”.

View this post on Instagram

A post shared by Radio Sindhi (@radiosindhiofficial)

आणखी वाचा – मलायकापासूनचा विरह अर्जुनला सहन होईना?, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अभिनेत्याची लक्षवेधी पोस्ट, म्हणाला, “गोष्टी कशाही झाल्या तरी…”    

यापुढे त्यांनी “ब्लॉकबस्टर सिंधी चित्रपट ‘हाल ता भाजी हालून’ आणि हिंदी चित्रपट ‘जय संतोषी मां’ची निर्मिती केली. महान गायिका लता मंगेशकर यांना सिंधी गाणे गाण्यासाठी ते एकमेव व्यक्ती आहेत. दादा सतराम रोहरा यांच्या निधनाने सिंधी समाजाची मोठी हानी झाली असून त्यांची पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – गुरुपौर्णिमानिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट, ‘श्री स्वामी समर्थ’ गाणं सर्वत्र प्रदर्शित

दरम्यान, १६ जून १९३९ रोजी सिंधी कुटुंबात जन्मलेल्या दादा सतराम रोहरा यांनी १९६६मध्ये ‘शेरा डाकू’ चित्रपटाद्वारे निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला. यानंतर त्यांनी ‘रॉकी मेरा नाम’, ‘घर की लाज’, ‘नवाब साहिब’ आणि ‘जय काली’ सारखे चित्रपट केले. यापैकी ‘जय संतोषी मा’ या चित्रपटाने अनेक विक्रम केले. हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. रिपोर्ट्सनुसार, ‘जय संतोषी मां’चे बजेट फक्त 5 लाख रुपये होते, पण त्यावेळी जवळपास 5 कोटी रुपये कमावले होते, जे आजच्या तुलनेत १०० पट जास्त आहे.

Tags: Dada Satram Rohra Passed AwayDada Satram Rohra Passed Away NewsJai Santoshi Maa
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
kareena kapoor on saif ali khan

‘या’ कारणांमुळे करीनाला सैफ अली खानबरोबर राहणं झालं कठीण, अभिनेत्रीने स्वतः खुलासा करत सांगितलं कारण, म्हणाली, "आमच्या नात्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.