आषाढी एकादशी म्हटलं की भक्तांसाठी, वारकऱ्यांसाठी पर्वणीच म्हणायला हवी. मैलोनमैल चालत पंढरीची वाट सरत हे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरातील विठ्ठल. वारकऱ्यांचा आत्मा, अनेकांची माउली, श्रद्धा म्हणून विठुरायाकडे कित्येक डोळे आसुसलेले असतात. या विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी एक नवंकोरं गाणं येत आहे. साऱ्या विठ्ठल भक्तांसाठी हे गाणं एक पर्वणीच असणार आहे. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत ‘इट्समज्जा ओरिजिनल’, ‘जाऊ पंढरीला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. (jau pandhrila song release)
सावळ्या विठुरायाचे हुबेहूब वर्णन आणि त्याच्या भेटीसाठी भक्तांची धावपळ या गाण्यातून रेखाटण्यात आली आहे. वारी करत हे वारकरी नेमाने पंढरपूरला जातात. तहान भूक हरपत प्रत्येक वारकरी आवश्यक गोष्टींचं गाठोडं जवळ बाळगून वारीचा हा सण साजरा करतात, याचं वर्णन या गाण्यात करण्यात आलं आहे. आयुष्यात एकदा तरी विठ्ठलाचं दर्शन घेण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाला उत्स्फूर्त करणारं हे गाणं नक्कीच ठरेल.
पाहा विठूरायाची भेट घडवून आणणारं नवंकोरं गाणं (jau pandhrila song release)
मीडिया वन सोल्युशन्सचे सर्वेसर्वा Sourindra Nath Dutta (शौरींद्र नाथ दत्ता) यांनी ‘जाऊ पंढरीला’ या गाण्याची निर्मिती केली असून या गाण्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलंय की, ‘मीडिया वन सोल्युशन्स’ निर्मित आणि ‘इट्समज्जा ओरिजिनल’ हे गाणं असून हे आम्ही निर्मित केलेलं पहिलंच गाणं आहे. या गाण्यातून आम्ही म्युझिक विश्वात पदार्पण करत आहोत. ‘इट्समज्जा’ अंतर्गत आम्ही महाराष्ट्रातील लोकगीतं नव्या ढंगात प्रेक्षकांच्या समोर आणणार आहोत. सावळ्या विठुरायाच्या भेटीस घेऊन जाणारं हे ‘जाऊ पंढरीला’ गाणं नक्कीच प्रत्येक वारकऱ्याच्या मनावर राज्य करेल अशी मी आशा बाळगतो.(jau pandhrila song release)
हे देखील वाचा – Itsmajja विठ्ठल भक्तांसाठी घेऊन येत आहे भक्तिगीताची खास पर्वणी ” जाऊ पंढरीला” पाहा भक्तिगीताचा खास टिझर
‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत ‘इट्समज्जा ओरिजिनल’, ‘जाऊ पंढरीला’ या गाण्याच्या गायनाची आणि संगीत दिग्दर्शनाची धुरा स्वप्नील गायकवाड यांनी उत्तरमरित्या सांभाळली आहे. ताल मृदूंगाच्या साक्षीने वारकऱ्यांची हुरहूर या गाण्यातून स्पष्टपणे जाणवतेय. नुकतंच हे गाणं ‘इट्समज्जाच्या ऑफिशिअल’ युट्युब आणि फेसबुक पेजवर प्रदर्शित करण्यात आलं असून प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या आनंदाला समर्पित करण्यात येत आहे.
