शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर ‘पाऊस’ वेबसीरिजची मोठी घोषणा, चित्रीकरणाला सुरुवात, कोणते कलाकार झळकणार?

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 11, 2024 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Its majja new web series Paus

'आठवी अ'च्या भरघोस यशानंतर 'पाऊस' वेबसीरिजची मोठी घोषणा, चित्रीकरणाला सुरुवात, कोणते कलाकार झळकणार?

‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल यांच्या ‘आठवी-अ’ या वेबसीरिजने मनोरंजन विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधीसोपी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे सांगण्यात आली आणि या सीरिजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या सीरिजने गेले अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. त्यामुळे या सीरजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे या सीरिजच्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक आतुर असायचे.

आपण ‘आठवी-अ’मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘आठवी-अ’ या सीरिजमधून प्रेक्षकांना देण्यात आली. मात्र प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. त्यामुळे या सीरिजने नुकताच सर्वांचा निरोप घेतला आहे. ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. पण ‘आठवी-अ’ ही सीरिज संपली असली तरी ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायमच तत्पर असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

हेही वाचा – “दौरा छान असला तरी…”, परदेशात निघालेला संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “मुंबईची, घरची आणि…”

प्रेक्षकांच्या याच मनोरंजनाची हमी घेत ‘इट्स मज्जा’ लवकरच ‘पाऊस’ ही नवीन सीरिज प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. ‘पाऊस’ हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या खास आठवणी असतात आणि या आठवणी बेभान करणार्‍या असतात. त्यामुळे ‘इट्स मज्जा’च्या ‘पाऊस’साठीदेखील अनेक प्रेक्षक आतुर आहेत.  नुकताच ‘पाऊस’ या नवीन सीरिजचा मुहूर्त पार पडला असून सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे आणि अनेक प्रेक्षकांनी या नव्या सीरिजबद्दल उत्सुकता दाखवली आहे.

हेही वाचा – Video : गावी कोकणात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब, चुलीवर केलं जेवण, साधेपणाने वेधलं लक्ष

त्यामुळे आता या सीरिजची नेमकी कथा काय आहे? या नवीन सीरिजमध्ये कलाकार कोणते आहेत? या नवीन सीरिज मधून प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार आहे. याची सर्वानाच उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या नवीन सीरिजची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचेच असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह हेड अंकिता लोखंडे आहेत. तसेच ही सीरिज तुम्हाला ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे.              

Tags: Its Majja Original Seriesmarathi entertainment newsPaus
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
bollywood actress on menstrual leave

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी हवी की नको?, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी मांडलं मत, नक्की काय महत्त्वाचं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.