गेले काही दिवस आमिर खानची मुलगी आयर खान व बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. या जोडीने मुंबईत नोंदणी पद्धतीने एकमेकांबरोबर लग्न केले. त्यानंतर उदयपूरमध्ये हे दोघे शाही पद्धतीने एकमेकांबरोबर पुन्हा विवाहबंधनात अडकले. नंतर या जोडप्याच्या लग्नाचे १३ जानेवारी रोजी मुंबईत भव्य रिसेप्शनदेखील पार पडले. या रिसेप्शन सोहळ्याला अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावलेली पहायला मिळाली होती. पार्टीचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Ira Khan On Instagram)
आयरा-नुपूर यांनीदेखील त्यांच्या लग्नाचे काही खास कक्षण सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते. आयरा-नुपूर या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दलची माहितीही सोशल मीडियाद्वारे शेअर केले होती. यंत्र दोघांच्या लग्नाआधीच्या विधींचे काही खास क्षणदेखील या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता नुकताच आयराने तिच्या लग्नाआधीचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत.
आयराने तिच्या लग्नाआधीचे काही खास फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. ‘लग्नाआधीच्या काही गोष्टी’ असं कॅप्शन देत तिने काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आयराने मित्र-मैत्रिणी, नुपूर, नुपूर व तिची आई व शेवटी तिने स्वत:चा एक फोटोदेखील शेअर केला आहे. तिच्या या फोटोमुळे आयरा सोशल मीडियावर टीकेची धनी झाली आहे. आयराने तिच्या या मित्र-मैत्रिणींच्या व नातेवाईकांच्या फोटोबरोबरच तिचा तोंडात सिगरेट असलेला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.


हेही वाचा – यंदाची संक्रांत पियुष रानडेसाठी आहे खूप खास, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “या दिवशी आम्ही दोघेही…”
लग्नासाठी तयार होत असताना आयराने सिगरेट तोंडात असलेला स्वत:चा एक सेल्फी फोटो काढला आहे आणि तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर कमेंट्समध्ये तिच्यावर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “किती निर्लज्जपणे स्वत:चा सिगरेटवाला फोटो शेअर केला आहे, शोबाजी करण्यासाठी फोटो शेअर केला आहेस का?, इतक्या चांगल्या फोटोंमध्ये सिगरेटवाला फोटो पोस्ट करायची काय गरज होती?, सर्वाधिक काळ चाललेले लग्न” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी आयराच्या त्या फोटोवर नाराजी व्यक्त केली आहे.