Soldier Viral Video : सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल शिकवण्याची शपथ घेतली. या दहशवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची आखणी केली. आणि ही मोहीम फत्ते केली. त्यानंतर आता पाकिस्तानही पेटून उठलं असून पाकिस्तानी सैन्याने भारतावर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. यावर भारतही चोख प्रत्युत्तर देत आहे. या सर्व युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिक मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहेत. भारतीय सैनिक जीवाचे रान करुन सीमारेषेवर लढा देत आहेत. डोळ्यांत तेल टाकून अहोरात्र जागरण करुन ही भारतीय सेना भारताचे नाव रोशन करण्यात लागली आहे.
या युद्धजन्य परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर सध्या आपल्या सैनिक बांधवांचे भावुक करुन सोडणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक जवानांची सुट्टी रद्द करत त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितले. यामुळे या सैनिक बांधवांच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत आसवं दिसली. देशसेवेसाठी जाणारा हा आपला माणूस पुन्हा परतेल की नाही ही भीती प्रत्येकाच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसली. याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान, एका सैनिक बांधवांच्या व्हिडीओमधील एक व्हिडीओ साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहे.
https://www.instagram.com/reel/DJdT5dLomj9/?utm_source=ig_web_copy_linkहा जुना व्हिडीओ असून marathi speaker या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकली जवानांच्या पाय पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून त्या चिमुकलीवरील संस्कारांची अनुभूती येते. समोर असलेल्या व्हिडीओमध्ये काही जवान उभे असतात त्यावेळेला एक चिमुरडी त्यांच्या दिशेला धावत जाताना दिसते. तिला पाहून एक जवान तिची विचारपूस करणार इतक्यात ती चिमुरडी खाली वाकत जवानाच्या पायाला स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेते. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या जवानाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येते.
पुढे ती चिमुरडी धावत परत येत असताना मध्येच थांबते आणि मागे वळून त्या जवानांना सॅल्यूट करते. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. सदर व्हिडीओ पाहता नेटकरी त्या चिमुरडीवरील संस्कारांचं कौतुक करताना दिसत आहेत. अर्थात, त्या मुलीच्या कृतीने संबंध भारत वासियांची मन जिंकली आहेत.