शुक्रवार, मे 30, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हिना खान ते महिमा चौधरी…; दीपिका कक्करच्या आधी ‘या’ अभिनेत्रींनी दिली आहे कॅन्सरशी झुंज, मृत्यूशी लढा आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dipika Kakar Liver Cancer

हिना खान ते महिमा चौधरी…; दीपिका कक्करच्या आधी 'या' अभिनेत्रींनी दिली आहे कॅन्सरशी झुंज, मृत्यूशी लढा आणि…

Dipika Kakar Liver Cancer : टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर यकृताच्या कर्करोगाची बळी ठरली आहे. तिला दुसऱ्या टप्प्याचा यकृत कर्करोग आहे, याबाबत तिने स्वतःच माहिती देत खुलासा केला आहे. दीपिकाच्या आधीही बर्‍याच अभिनेत्रींनी कर्करोगाचा पराभव केला आहे. दीपिका कक्कर हिने यापूर्वी सोशल मीडियावर यकृताच्या ट्यूमरबद्दल माहिती दिली होती. यानंतर तिने हे उघड केले आहे की, त्याला स्टेज २ चा यकृत कर्करोग आहे. आता लवकरच म्हणजे पुढील आठवड्यात तिच्यावर शस्त्रक्रिया होईल. दीपिकाच्या कर्करोगाच्या बातमीने तिच्या चाहत्यावर्गात काळजीच वातावरण पसरलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांनादेखील कर्करोगाचा सामना करावा लागला आहे. सन २०२० मध्ये तिच्या रक्तात कर्करोग आढळला. मात्र या कठीण काळातही अभिनेत्री खचली नाही तिने स्वतःला मजबूत ठेवलं आणि हा लढा दिला. आता तिने या प्राणघातक आजाराचा पराभव केला असून ती सुखरूप आहे. टीव्ही अभिनेत्री चित्रा मित्तल हिला देखील २०२२ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यांनी याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली. या यादीमध्ये मनीषा कोइराला देखील समाविष्ट आहे.

आणखी वाचा – कंबरेवर हात ठेवला, वाईट स्पर्श केला अन्…; अमृता सुभाषनं सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “तो ज्येष्ठ निर्माता…”

मनीषाला २०१२ मध्ये स्टेज चारचा डिंबग्रंथीचा कर्करोग झाला होता. आता तिने कर्करोगाशी लढा दिला आहे. तर मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान हिनेदेखील काही काळापूर्वी स्तनाच्या कर्करोगाबद्दल सांगितले. अभिनेत्री सध्या या आजारपणावर उपचार करताना दिसत आहे. अभिनेत्रीवर सध्या केमोथेरपी सुरु आहे. ती तिच्या आरोग्याबद्दल चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असते.

आणखी वाचा – आईला कॅन्सर पण दोन वर्षाचा लेकालाही कळतोय त्रास, दीपिका कक्करने सांगितली परिस्थिती, मुलगा रुहान म्हणाला…

सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिला स्टेज चार मेटास्टॅटिक स्तनाचा कर्करोग होता. या आजारातून तिची मृत्यू होण्याची शक्यता अधिक होती. ३० टक्के अभिनेत्रीची जगण्याची शक्यता असल्याचं बोललं जात होतं. आता सोनालीने कर्करोगाशी लढाई जिंकली आहे. २०२२ मध्ये महिमा चौधरी यांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहिती मिळाली. तिने स्वतःच याबद्दल माहिती दिली. तिने आपला हा आजारपणातील प्रवास वेळोवेळी शेअर केला आहे.

Tags: Dipika kakar liver cancerentertainmenttelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi hagawane death case
Social

“माझी मुलगी तर गेली…”, भरल्या डोळ्यांनी हात जोडत वैष्णवीच्या वडिलांची विनंती, म्हणाले, “एखाद्या लेकराबाबत असं…”

मे 29, 2025 | 5:56 pm
Rohan Pednekar On Television Industry
Entertainment

“मराठी बोलता, वाचता येत नाही…”, लोकप्रिय अभिनेत्याकडून टेलिव्हिजन विश्वातील सत्य परिस्थिती समोर, म्हणाला, ” उगाचच डोक्यावर…”

मे 29, 2025 | 5:25 pm
Bharti Singh Health
Entertainment

भारती सिंहची तब्येत बिघडली, रक्त तपासणी करताना घाबरली अन्…; नेटकरी म्हणाले, “करोना तर…”

मे 29, 2025 | 4:00 pm
Vaishnavi hagawane death case
Social

“संशय होता तर लग्न का केलं?”, वैष्णवी हगवणेवर केलेल्या आरोपांवर कस्पटे कुटुंबियांचा सवाल, पैशांसाठी लग्न करुन…

मे 29, 2025 | 2:05 pm
Next Post
Ashok Saraf

पायलट भाचीकडून स्पेशल Announcement, पद्मश्री अशोक सराफ यांचे विमानप्रवासात कौतुक, म्हणाली, "आजचा प्रवास…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.