गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हेमांगीची ‘पठाण’ बद्दल पोस्ट आणि चाहत्यांची नाराजी…

सौरभ जाधवby सौरभ जाधव
फेब्रुवारी 6, 2023 | 6:31 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
hemangi kavi on pathan

hemangi kavi on pathan

मनोरंजन म्हणलं कि यशा सोबत टीकेचे वार ही आलेच. यश आणि टीका अशा दोन्ही गोष्टींना तोंड देणारा शाहरुख खानचा ‘पठाण’ सध्या बॉक्स ऑफिस सोबतच सोशल मिडियावर सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. बेशरम रंग गाण्याच्या वादानंतर पठाण चित्रपटावर काय परिणाम होणार याची चिंता सगळ्यांना होती पण त्यावादाचा चित्रपटावर काही एक परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. पहिल्या दिवसापासून या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या चाहत्यांनी ‘पठाण’ला भरभरून प्रेम दिलं आहे.(hemangi kavi on pathan)

पठाण चित्रपटाच्या वादांसंदर्भात काही कलाकारांनी सुद्धा शाहरुखला पाठींबा देत वाद निर्माण करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. या कलाकारांमध्ये आता हेमांगी कवीने सुद्धा पुढाकार घेतला आहे आणि तिच्या या पोस्टवर चाहते काहीसे नाराज ही दिसत आहेत. शाहरुखच्या पठाण चित्रपतातील लुकचा फोटो शेअर करत हेमांगी म्हणते कि ‘ तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीए पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहीले आहेत. मी त्याची fan आहे कळल्यावर अनेक जणांनी मला unfollow केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. ???? असो.


मला वाटतं या द्वेषाचं मुळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःहाला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!!
सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना Theatre मध्ये आणणे हे हाच करू जाणे!(hemangi kavi on pathan)
स्वतःहाच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए! ????
पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया!
तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला!
बाकी…

झूमे जो पठान मेरी जान,
महफ़िल ही लूट जाए!’

हे देखील वाचा – शिरोडकर, प्राजक्ता तर आता मीराच्या भूमिकेतून केतकीच रुपेरी पडद्यावर पुन्हा आगमन…

हेमांगीच्या या पोस्ट वर काही चाहत्यांनी पाठिंबा तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. “पठाण मूवीमुळे मराठी शो टॉकीजला लागत नाही आहे.बंद पाडले आहेत सर्व मराठी मूवी त्यावर तुमचा काही नाही का आक्षेप?मॅडम तुम्ही नेहमी मराठी पिक्चर साठी लढा देतात.हे अचानक उमळलेलं शाहरुख बंद करा????” , “ताई खूप भावनिक झालात थोड्या भावना जपून ठेवा नंतर तुमच्या मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळणार नाहीत तेव्हा उपयोगी पडतील ????????” अशा कमेंट्स करून चाहत्यांनी नाराजीचा सूर दर्शवला आहे.(hemangi kavi on pathan)

Tags: entertainmenthemangi kaviITSMAJJAmoviepathanshahrukh khan
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Hrishikesh joshi

'येतोय तो खातोय' ऋषिकेश जोशी दिगदर्शित सध्याच्या राजकारणावर भाष्य करणार नाटक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.