आयपीएल म्हणजे प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीचं. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद देण्यात येतो यंदाच्या हंगामाला देखील प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघातील बदललेलं नेतृत्व, खेळाडू यामुळे यंदाचा हंगाम जरा जास्त चर्चेचा विषय ठरत आहे. यंदा सर्वाधिक चर्चेत असलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि त्याचं कारण म्हणजे या संघाचा नवीन कर्णधार हार्दिक पांड्या. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचाही सामना करावा लागला. अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या मते या पराभवांमागे हार्दिकने सामन्या दरम्यान घेतलेले काही चुकिचे निर्णय कारणीभूत आहेत. तसेच मुंबई इंडियन्स संघात आता काही तरी बिनसल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. (Hardik Pandya Lasith Malinga Video)
हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच आणि मुंबई इंडियन्समधील माजी गोलंदाज लसिथ मलिंगा व हार्दिक पांड्या यांच्यातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्हिडीओनुसार मलिंगा व पोलार्ड चर्चा करत असताना हार्दिक पांड्या तिथे येतो तेव्हा लसिथ मलिंगा तिथून निघून जाताना दिसतो. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये मलिंगा हार्दिककडे हस्तांदोलन करण्यासाठी गेला असता हार्दिकने त्याकडे दुर्लक्ष करत मलिंगाला धक्का देत बाजूला केलं. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंवरून मुंबईच्या संघात काही बिनसलं आहे का या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
Does Hardik Pandya kicked Lasith Malinga? His hands, face reaction same story.
— Satya Prakash (@Satya_Prakash08) March 28, 2024
Not a good way to treat legend like Lasith Malinga. #HardikPandya #SRHvMI pic.twitter.com/Yg5a5hNRTE
माजी कर्णधार रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यापासून मुंबई इंडियन्सच्या संघाला चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. तसेच हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स फ्रेंचाइजीचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या सोबत रोहित शर्मा ने बराच वेळ चर्चा केल्याचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला होता . तसेच रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि नीता अंबानी यांचा ही चर्चा करतानाच एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटो व व्हिडीओमध्ये रोहितच्या चेहऱ्यावर ही काही प्रमाणात नाखुषी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. (Hardik Pandya Lasith Malinga Video)
रोहित शर्माच्या या नाखुशीचं कारण नक्की काय आहे? रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदी विराजमान होणार का? मुंबई इंडियन्सची आगामी सामन्यासाठी नक्की काय तयारी असणार या बाबतचे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. रोहित शर्माच्या चाहत्यांचा मात्र रोहितने पुन्हा कर्णधार व्हावे या गोष्टीकडे जास्त कल दिसत आहे तशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.