चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा होणार पाडव्याचा सण… (star pravah gudhipadva celebration)

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार दरवर्षी प्रमाणे यंदाही सज्ज झाला आहे.
पहा स्टार प्रवाहचा यंदाचा गुढीपाडवा (star pravah gudhipadva celebration)

आई कुठे काय करते, ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, सहकुटुंब सहपरिवार आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने ही नटून थटून गुढीपाडवा साजरा केला.

ठरलं तर मग मध्ये अर्जुन आणि सायलीचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने सायली आणि अर्जुन गुढीची पूजा करणार आहेत.

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील मोरे कुटुंबात दरवर्षी उत्साहात गुढी उभारली जाते.

गुढीच्या पुजेची सर्व तयारी पश्या करत असे. (star pravah gudhipadva celebration)

यावर्षी मात्र पश्या नाही त्यामुळे पूजा होणार की नाही अश्या विचारत असताना पश्या गुपचूप पुजेची तयारी करुन जातो.त्यामुळे सरु वहिनीला खात्री आहे की पश्या आसपासच आहे. यंदा पश्यासाठी मोरे कुटुंब एकत्र येऊन गुढी उभारणार आहेत.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप गौरीसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे लक्ष्मीसोबत जयदीप-गौरी गुढीपाडवा साजरा करणार आहेत.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतही कानेटकर कुटुंबाने आनंदाची गुढी उभारली आहे.
