सोशल मीडियावर दिवसागणिक विविध व्हिडीओ व फोटो व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून हसू अगदी अनावर होतं. कोण कधी काय करेल याचा अंदाज आपणही बांधू शकत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मच्छरांना टाळी मारुन अनेक लोक मारतात. प्रत्येक घरात हे दृश्य पाहायलाच मिळतं. पण मच्छरांच्या मृत्यूची नोंद ठेवली जाते हे कधी तुम्ही ऐकलंय का?. असं आता घडत आहे. एक मुलगी मच्छरांच्या मृत्यूची नोंद ठवते. स्वतः मच्छर मारल्यानंतर वहीत लिहून ठेवते. इतकंच काय तर ते मच्छर जपूनही ठेवते. तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटलं ना… पण हे अगदी खरं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ आता समोर आला आहे. (girl counting dead mosquitoes video viral)
मच्छरांना ठेवते नाव
मच्छर मेला की, त्याची नाव, तारीख, वेळसह ती नोंद ठेवते. एवढ्यावरच ती मुलगी थांबत नाही तर मेलेलं मच्छर ती पेपरवर चिटकवते. त्याचबरोबर सगळी माहिती ती लिहिते. हा तिचा अनोखा छंद आहे असंच म्हणावं लागेल. किचनमध्ये मेलेल्या मच्छरचं नाव महेश, हॉलमध्ये मेलेल्याचं नाव सुरेश, बाथरुममध्ये मेला तर बबली… असं तिने मच्छरची नावं ठेवली आहेत. याची तिला प्रचंड आवड आहे.
आणखी वाचा – “बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले अन्…”, मृत्यूच्या बातमीवर भडकले आदेश बांदेकर, अनेकांचे फोन आले अन्..
क्राइम सीनची सविस्तर माहिती
A4 साइजचा पेपर ती घेते. कॉलम तयार करते. मच्छर मारुन झाल्यानंतर त्या पेपरवर ती मेलेला मच्छर चिकटपट्टीने चिटकवते. त्याच्यासमोर मच्छरांचं जे नाव ठेवलं आहे ते लिहिते. तसेच वेळ, ठिकाण अशी संपूर्ण माहिती भरते. नाव – बबली, मरणाची तारीख – ५ एप्रिल, जागा – बाथरुम, मरण्याचं कारण – टाळी मारुन मृत्यू अशी माहिती ती लिहिते.
आणखी वाचा – “मम्मी, मम्मी…”, लेकीने डोळ्यांदेखत पाहिला आईचा मृत्यू, रील्सच्या नादात पोरकी झाली चिमुकली, Video व्हायरल
पाहा व्हिडीओ
Mosquito 🦟 ki murder ki records 😭😭🙏 pic.twitter.com/xHw0DClUm4
— Shreyanshi Singh 🧚♀️ (@thenicks_7) April 11, 2025
या मुलीने ही सगळी माहिती लिहिलेली व्हिडीओमध्ये दाखवली आहे. @thenicks_7 नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लाखो व्ह्युज या व्हिडीओला मिळाले आहेत. इतकंच काय तर अनेकांना तिचा हा छंद आवडला आहे. अभ्यास का होत नाही हे आता कळालं, मच्छरांच्या कुटुंबाचा तर तू विचार करायला हवा होता, असेच लोक भविष्यात सायको किलर होतात अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पण ही मुलगी असं का करत असेल हा प्रश्न अनुत्तरितच आहे.