सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची. या पर्वातील सदस्यांच्या दमदार खेळीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. घरातील सदस्यांचा खेळ दिवसेंदिवस उलगटत असून पुढे काय होणार या बाबत प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय. ‘बिग बॉस’ मराठीच्या या पर्वातील सदस्यांच्या यादीत एक नावं चांगलंच चर्चेत होतं ते म्हणजे छोटा पुढारी म्हणून लोकप्रिय असलेला घन:श्याम दरवडे. मागील आठवड्यात झालेल्या एलॅमिनेशनमध्ये घनश्याम देखील नॉमिनेट होता आणि प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे घन:श्यामला या घराचा निरोप घ्यावा लागला. घरातून बाहेर येताच घनश्यामने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये घनश्यामने घरातील इतर सदस्यांची चांगलीच पोलखोल केलेली दिसून येते. (Ghanshyam Darwade About Harassment)
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये “घरातील वरिष्ठ सदस्यांना योग्य तो मान दिला गेला का?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत घनश्याम म्हणाला,”मी व्यक्तिगत कधी त्यांच्या करिअरवर काहीही बोललो नाही. मी उलट त्यांना मान, सन्मान दिला. उलट या घरात मी असे पर्यंत मला कधीही माज आला नाही. मी लहान असल्यामुळे मला खूप छळलं गेलं. पण मी कधी या गोष्टीचा घरात गाजावाजा केला नाही. ‘बिग बॉस’च्या माझ्या ६ आठवड्याच्या इतिहासात तुम्ही कधीही बघा मी मागे ही नाही आणि पुढे ही नाही कोणत्या कलाकाराचा कधी अपमान केला नाही.
हे देखील वाचा- छोटा पुढारीच्या मते Top 5 मध्ये निक्की नाही, खेळाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला, “थोडी शंका आहे कारण…”
घनश्यामच्या म्हणण्यानुसार बिग बॉसच्या घरात असताना अंकिता वालावलकर ने “याला दोन कानशिलात लगवण्याची इच्छा होते” तर एका टास्क दरम्यान जान्हवी चक्क घनश्यामच्या अंगावर बसली होती यावरून भाऊच्या धक्क्यावर रितेशने या दोघीनां चांगलाच सुनावलं देखील होतं. घरातून बाहेर आल्यानंतर घनश्यामने निक्की बरोबरच्या नात्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर देखील मौन सोडून उत्तर दिलं. उत्तर देत घनश्याम म्हणाला ,”निक्कूताई आणि माझं नातं एकदम पवित्र आहे”. (Ghanshyam Darwade About Harassment)
हे देखील वाचा- “रितेश सरांशी माझं वाजलं होतं…”,भाऊच्या धक्क्यावरील ‘त्या’ वादावर छोटा पुढारीने सोडलं मौन, म्हणाला, “मैत्रीला डाग लावून…”
बिग बॉसच्या घरात आता नवीन डाव आखले जात असून या डावात वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून संग्राम चौघुलेची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. घरात येताच संग्रामने आपला खेळ दाखवण्यास सुरुवात केली असून समोर आलेल्या प्रोमोमध्ये तो निक्कीबरोबर पंगा घेताना दिसत आहे. तसेच घरात एन्ट्री घेतल्यावर त्याने अरबाजला ” तू तुझ्यापेक्षा कमी ताकद असलेल्या लोकांना तुझी दादागिरी दाखवली पण आता तुला बरोबर उत्तर नक्की मिळणार” असं म्हणत धमकी देखील दिली. आता बिग बॉसच्या घरात कोणता नवीन राडा पाहायला मिळणार हे रंजक ठरणार आहे.