सोशल मीडियावर सध्या फक्त एकाच नावाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे गौतमी पाटील ची. “सबसे कातिल गौतमी पाटील” अशी तरुण मंडळींनी तिची टॅगलाईन बनवली आहे. तिच्या नृत्याने तिने सगळ्यांनाच वेड केलं आहे. याच बरोबर तिच्या नृत्यप्रकारामुळे तिच्यावर टीकाही करण्यात आली. गौतमी आता चर्चेत अली आहे तिच्या नवीन चित्रपटामुळे. नुकताच गौतमीने चित्रपटाचा टिझर तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Gautami Patil New Film)
“घुंगरू” हे गौतमीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे. या चित्रपटात गौतमी लावणी कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. गौतमीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर एका चाहत्याने म्हंटलंय “गौतमी म्हणल्या वर मूव्ही हिट तर होणारच ना..नाद च खुळा सबसे कातील गौतमी पाटील” तसेच बऱ्याच जणांनी तिला हार्ट इमोजी देखील पाठवल्या आहेत.

हे देखील वाचा: अरुंधतीबद्दल अनिरुद्ध बोलताच,अनघाचा अनिरुद्धला टोमणा
गौतमीने नुकतीच एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. तेव्हा तिला जोडीदाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता ती म्हणाली मला पैसा, बांगला, प्रतिष्ठा, यापैकी काहीच नको आहे. मला फक्त असेल तश्या वेळेला साथ देणारा जोडीदार हवा आहे. असं तिने या मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच घरची अर्धी जबाबदारी उचलण्यासाठी पुरुषाची साथ हवी असं तिला वाटत, म्हणून तिची लग्न करण्याची इच्छा आहे असं देखील तिने या वेळेस सांगितले आहे. (Gautami Patil New Film)
गौतमी पाटीलला कशी मिळाली प्रसिद्धी?
गौतमी पाटील हिने तिच्या वडिलांना लहानपणीच गमावले. त्यानंतर आईला घर चालवण्यासाठी हातभार लागावा म्हणून गौतमीने स्टेज शो करायला सुरुवात केली. गौतमी एक सर्वसाधारण मुलगी होती. परंतु तिचे काही डान्स चे व्हिडीओ वायरल झाल्या नंतर तिच्यावर अनेक मराठी कलाकारांनी टीका केली, याच बरोबर अनेक पक्षांच्या महिला नेते मंडळींनी देखील गौतमीला धारेवर धरलं होत.
हे देखील वाचा: स्टार प्रवाहची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला मुलगी झाली हो नंतर पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेत्री दिव्या सुभाष
तिच्या वायरल झालेल्या व्हिडीओ मुळे तिला प्रसिद्धी मिळायला लागली, आता गौतमीचा क्रेज तरुण मंडळींमध्ये इतका वाढलाय की तिचा डान्स पाहण्यासाठी कार्यक्रमाचा संपूर्ण एरिया पॅक झाला असेल तर लोक अक्षरशः झाडावर चढून तिचा डान्स बघतात. आता गौतमी पाटीलचा सिनेमा येतोय आता गौतमी पडद्यावर प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे.