सध्या आघाडीवर असणाऱ्या मराठी अभिनेत्रींनपैकी वैदेही परशुरामी हे चर्चेत असणार नाव आहे. झोंबिवली तसेच जग्गू आणि ज्युलिएट या चित्रपटांमुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत आहे. तिच्या अभिनयातील नाजूकपणा प्रेक्षकांना कायमच आवडतो.मोठ्या पडद्यावर वैदेहीने तिच्या कामाची छाप पाडली आहे.एका पाठोपाठ एक अशा दमदार चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. (Vaidehi Parashurami)
वेड लावी जीव, कोकणस्थ, वृंदावन यांसारखे अनेक चित्रपट तिने केले, आणि डॉकटर. काशिनाथ घाणेकर या चित्रपटातल्या तिच्या कांचन या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मराठी प्रमाणे हिंदी सिनेसृष्टीतही वैदेहीने तिच्या कामाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. सिम्बा मधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या निदर्शनास आली.

वाचा वैदेहीच्या फोटोवरील मजेशीर कमेंट्स (Vaidehi Parashurami)
या व्यतिरिक्त वैदेही वेग-वेगळ्या स्टाईल्स मध्ये फोटोशूट करताना पहायला मिळते. तिच्या या फोटोजची झलक ती तिच्या सोशल मीडियावरून शेअर करत असते. तिचा प्रत्येक अंदाज प्रेक्षकांना आवडतो. ट्रेडिशनल ग्लॅमर्स अशा वेगवेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत असणारी वैदेही पुन्हाएकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच तिचा एक निळया रंगाच्या ड्रेस वरचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तिने गुडघ्यावर हात ठेवून पोज दिली आहे. आणि या पोजमुळे प्रेक्षकांनी तिच्या या फोटो वर गरम पाण्याने गुडघा शेकवला कि तो दुखायचा कमी होतो, फोटो मस्त आहे पण त्यात दुसरा हात कुठे आहे अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत तर काहींनी या फोटोवर पसंती देखील दर्शवली आहे.(Vaidehi Parashurami)

नाजूक अंदाजाप्रमाणे वैदेहीने डँशिंग भूमिका देखील केल्या आहेत.जग्गू आणि ज्युलिएट मधील तिची भूमिका अशीच आहे. तिचा हा अदांज देखील प्रेक्षकांना तितकाच आवडला. अमेय वाघ सोबत ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत बघायला मिळाली.
हे देखील वाचा : वैदेहीच्या फोटोवरील आकाश ठोसरची कमेंट ठरतेय लक्षवेधी