भारतात पुरुषप्रधान संस्कृती ही बऱ्याच काळापासून आहे, असे असले तरी स्त्रीचे महत्व नाकारता येणार नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ही स्त्री असते असे म्हणतात आणि ते अगदी खरं आहे. आई, बहीण, बायको, मैत्रीण यांचे अस्तित्व आपण कधीच नाकारू शकत नाही. (female oriented marathi serials)
आजच्या महिलांना समाजात समान अधिकार मिळत आहे. आजच्या महिला चूल मूल सांभाळत ऑफिसची जबाबदारीही पेलवत आहेत. खेळ, अभिनय, राजकारण, शिक्षण सारख्या सर्वच बड्या क्षेत्रात या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला ठसा उमटवत आहेत. महिलांचा समाजातील मान वाढावा त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करतात.
पहा स्त्री केंद्रित करणाऱ्या पाच मालिका – (female oriented marathi serials)
सध्या आपण पाहतो मनोरंजनाचे एकमेव मुख्य साधन म्हणजे टेलिव्हिजन. आणि या टेलिव्हिजनवर सुरु असलेले कार्यक्रम म्हणा वा मालिका या कोणत्या ना कोणत्या कथानकाने स्त्रियांना उत्तेजित करत असतात. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी या महिला अभिनेत्या आपल्या अभिनय कौशल्याने प्रभाव पाडत असतात. आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आपण मराठी वाहिन्यांवरील पाच महिलाभिमुख मालिकांचा आढावा घेणार आहोत. (female oriented marathi serials)
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील अभिनेत्री मधुराणी गोखले म्हणजेच अरुंधती या पात्राने तर साऱ्या महिला वर्गाला वेडच लावलं. आईची जागा कधीच कुणी घेऊ शकत नाही. वा तिसरीच व्यक्ती कधी आपली आई बनू शकत नाही. कुटुंबाचे संगोपन करण्यात आईची माया ही जुंपली जाते दरम्यान तिला होणाऱ्या यातना, तिचा आनंद समजायला आपण कुठेतरी कमी पडतो याचे हुबेहूब वर्णन करणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’.
====
हे देखील वाचा – महिलांच्या संघर्षाचा गौरव करणारे ५ खास चित्रपट
====
झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ ही मालिका म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आपल्यातील कलागुणांना वाव देत या मालिकेतील अभिनेत्री दीपा परब म्हणजेच अश्विनी तिची लढाई कशी लढते. तिच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी तिची होणारी तारेवरची कसरत पाहणं मालिकेत रंजक ठरतंय.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’. या मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईक म्हणजे लते हे पात्र प्रेक्षकांना विशेष भावतं. या मालिकेत आपल्या प्रेमासाठीची लढाई पाहणं रंजक ठरतंय शिवाय वडिलांच्या निधनानंतर आपल्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळावं तिला वडिलांची कमतरता भासू नये म्हणून एका स्त्रीची सुरु असलेली धडपड अतिशय रंजक आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’ ही मालिका धार्मिक असून आई एकविरा देवीवर बेतलेली आहे. या मालिकेत अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत असून एकविरा आईच्या भूमिकेत मयुरी वाघ पाहायला मिळतेय. संकटातून भक्तांना तारण्यासाठी एकविरा आई कशी धावून येते याची प्रचिती या मालिकेतून होतेय.(female oriented marathi serials)
झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गाडी नवं राज्य’ या मालिकेतील अभिनेत्री पल्लवी पाटील म्हणजेच आनंदी या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. साधीभोळी, सोज्वळ अशी आनंदी गावाकडून येऊन मुंबईत कशी रुळते. आणि मुख्यत्वे विवाहित माणसाशी लग्न केल्यानंतर त्याची बाजू सांभाळून घेत, त्याच्या कुटुंबाला कसा आधार देते, त्यांना कशी शिकवण देते हे या मालिकेत पाहायला मिळतंय.