रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे धक्कादायक निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह, मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 14, 2024 | 10:58 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
pradeep k vijayan

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे धक्कादायक निधन, बंद खोलीत आढळला मृतदेह, मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट

चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेते प्रदीप के विजयन यांचे निधन झाले आहे. प्रदीप के विजयन यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रदीप के विजयन हे चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीनंतर अभिनेत्याचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. (Pradeep K Vijayan death)

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, अभिनेता बुधवारी त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला. दोन दिवस कोणतीही बातमी न मिळाल्याने अभिनेत्याचा मित्र त्याला त्याच्या घरी भेटायला गेला असता तो घरी मृतावस्थेत आढळून आला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी पोलीस मृत्यूच्या कारणाचा तपास करत आहेत. अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

आणखी वाचा – उमेश कामतची एकाच वेळी दोन स्वप्नं पूर्ण, पोस्ट शेअर करत सांगितली आनंदाची गोष्ट, म्हणाला, “हाऊसफुल्ल…”

मिळालेल्या माहितीनुसार असं समोर आलं आहे की, घराचा दरवाजा बंद होता. मित्राने अनेकदा ठोठावूनही प्रदीपने दरवाजा उघडला नाही, त्यानंतर अभिनेत्याच्या मित्राने पोलिसांना कळवले. अग्निशमन दलासह नीलंकराई पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. पोलिसांना अभिनेत्याच्या डोक्यावर जखमेच्या खुणाही आढळल्या. पोलिस अभिनेत्याचा मृतदेह रॉयपेट्टा सरकारी रुग्णालयात घेऊन गेले आहे. अभिनेता प्रदीप के विजयन ‘थेगिडी’ मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी खूप लोकप्रिय झाले होते. याशिवाय त्यांनी ‘टेडी’, ‘इरुम्बू थिराई’ आणि ‘रुद्रन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tags: Pradeep K Vijayan deathPradeep K Vijayan passed awaytamil actortamil actor pradeep death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Sushant Singh Rajput fourth death anniversary actor’s sister Shweta shared an emotional post in memory of her brother.

"शेवटी न्याय मिळालाच नाही", सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चार महिन्यांनंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली, "या खटल्यामध्ये..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.