Ekta Kapoor Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : एकता कपूर आणि टेलिव्हिजन हे एक निराळंच समीकरण आहे. एकता कपूरला टेलिव्हिजनची राणी म्हणूनही संबोधले जाते. आजवर तिने अनेक मालिका दिल्या आहेत ज्या हिट ठरल्या आहेत. या यादीतील मुख्य नावे म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘कहानी घर घर की’. प्रत्येक संध्याकाळच्या वेळी घरोघरी या दोन शोचे शीर्षक गीत ऐकू यायचे. या मालिकांमध्ये येणारे ट्विस्ट मालिकेच्या प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवत. आता पुन्हा एकदा एकता कपूर प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या करणार आहे. एकता कपूर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या मूळ कलाकारांसह परतणार आहे.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका तब्बल आठ वर्ष म्हणजे २००० ते २००८ या सालापर्यंत सुरु राहिली. या मालिकेतून स्मृति ईरानीने तुलसी काक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता ही मालिका पुन्हा एकदा जुन्या कलाकारांसह परत येत आहे. या मालिकेवर आठ वर्ष प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, मालिका संपून बराच काळ लोटला असला तरी आजही प्रेक्षक या मालिकेला, मालिकेच्या शीर्षक गीताला, मालिकेतील कलाकारांना मिस करत आहेत.
आणखी वाचा – हत्या करुन तीन वर्षाच्या चिमुकलीला सुटकेसमध्ये भरलं; ‘त्या’ शेजाऱ्याला काय मिळालं?
पिंकविलाच्या अहवालानुसार, ही मालिका मर्यादित असेल आणि त्यावर काम सुरु आहे. एकता कपूर आणि तिची टीम ही बातमी गुप्त ठेवण्यासाठी खूप काळजी घेत आहेत. या व्यतिरिक्त माजी महिला आणि बाल विकास मंत्री स्मृति इराणी तुळशी विराणी यांच्या भूमिकेत परतण्यासाठी कठोर परिश्रम करीत आहेत. मालिकेचा प्रारंभिक शॉट समान आहे ज्यामध्ये तुळशी तिच्या घरात प्रेक्षकांचे स्वागत करते आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मधील प्रत्येक पात्राशी देखील ओळख करुन देते. मूळ मालिकेच्या शूटिंगच्या ठिकाणी हे पुन्हा शूट सुरु केले जाईल.
आणखी वाचा – Ghibli ट्रेंड नक्की कसा सुरु झाला?, या कंपनीचा मालक कोण?, एकूण कमाई आहे तब्बल…
पिंकविलाच्या अहवालानुसार, अमर उपाध्याय यांनीही ‘डोरी’ या मालिकेतून एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली. आणि याचे कारण म्हणजे ‘सास भी कभी बहू थी’ मालिकेचं शूटिंग असावं. आता मिहिरच्या भूमिकेत अमर यांना पाहणं रंजक ठरणार आहे.