शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, मोठी स्टारकास्ट पडद्यावर झळकणार

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 14, 2025 | 3:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Director Satish Rajwade announced new movie Premachi Goshta 2 video shared on social media

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या 'प्रेमाची गोष्ट २’ या आगामी चित्रपटाची घोषणा, व्हिडीओ व्हायरल

‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’, ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ अशा दर्जेदार चित्रपटांमधून हटके लव्हस्टोरीज् जगासमोर आणणारे दिग्दर्शक म्हणजे सतीश राजवाडे. सतीश राजवाडे यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली होती. दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची ही प्रेमकहाणी ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये होती. फारसे ताणतणाव, वळणे, धक्के, भावनिक अत्याचार काहीही नसलेली ही ‘प्रेमाची गोष्ट’ प्रेक्षकांना भावली होती. त्याच प्रेक्षकांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे चित्रपटाचे निर्माते या गाजलेल्या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. (premachi goshta 2 movie announced)

प्रेम कधी-कधी नशिबाशी खेळतं आणि कधी नशीब प्रेमाला नव्या वाटेवर घेऊन जातं, या संकल्पनेवर आधारित ही प्रेमकथा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नात्यांचा रंजक प्रवास पाहायला मिळेल. ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे नाविन्य म्हणजे यात व्हीएफएक्स आणि प्रेमकथेचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ येत्या जून २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. यामध्ये अविनाश नारकर, प्रसाद बर्वे, रेश्मा रामपूर, रमाकांत दायमा, राजेश मापुस्कर, पूजा वानखेडे व करण परब हे कलाकार असणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – सई, प्रसाद, समीर, ईशा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार, ‘गुलकंद’मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जुगलबंदी होणार

सोशल मीडियावर या चित्रपटाचा एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एका जुन्या ९०च्या लोकप्रिय गाण्याने या व्हिडीओची सुरुवात होते. मग पुढे सतीश यांच्या सर्व चित्रपटांची नावे समोर येतात आणि अखेर एका दरवाज्यामागून ‘प्रेमाची गोष्ट २’ हे नाव समोर येते. “प्रेमाचा Effect असणारी मनातली स्पेशल गोष्ट. येत्या जून मध्ये घेऊन येत आहोत” असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसंच ‘प्रेमाची गोष्ट २’ या शीर्षकाखाली “होऊ दे तुझ्या मनासारखं” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – “तिनेच दारुची सवय लावली”, प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर धक्कादायक आरोप, काळं सत्य

दरम्यान, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. सतीश राजवाडे यांच्या प्रेमाची गोष्ट’ने प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता या चित्रपटाचा भाग २ प्रेक्षकांसाठी एक खास भेट ठरणार आहे. येत्या जून २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. त्यामुळे अनेकजा याची वाट पाहत आहेत हे नक्की…

Tags: premachi goshta 2 moviepremachi goshta 2 movie announcedsatish rajwade announced new movie premachi goshta 2
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame actress Janhavi Killekar commented on the treatment of women in the society and their driving skills jokes

गाडी चालवणाऱ्या महिलांची अक्कल काढणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, आला वाईट अनुभव, म्हणाली, "रस्ता खोदलेला असताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.