शनिवार, मे 31, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईला कॅन्सर पण दोन वर्षाचा लेकालाही कळतोय त्रास, दीपिका कक्करने सांगितली परिस्थिती, मुलगा रुहान म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 28, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Dipika kakar liver cancer

आईला कॅन्सर पण दोन वर्षाचा लेकालाही कळतोय त्रास, दीपिका कक्करने सांगितली परिस्थिती, मुलगा रुहान म्हणाला…

‘ससुराल सिमर का’ मालिकेमुळे नावारुपाला आलेली दीपिका कक्कर सध्या शारीरिकरित्या खचली आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिका व तिचा पती शोएब इब्राहिमने सगळ्यांसमोर एक सत्य आणलं. दीपिकाला टेनिस बॉल आकाराचा लिव्हरला ट्युमर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र हा ट्युमर म्हणजे नक्की कर्करोग आहे का? याचं निदान आतापर्यंत झालं नव्हतं. अखेरी दीपिकाला लिव्हरचा कर्करोग असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. काही तपासण्या केल्यानंतर दीपिका व शोएबला याबाबत डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दीपिकाला दोन वर्षांचा लहान मुलगा आहे. त्याची चिंता तिला सतत सतावत आहे. युट्युब चॅनलद्वारे नवा व्हिडीओ शेअर करत शोएबने याबाबत माहिती दिली. (Dipika kakar liver cancer)

शोएबबरोबरच दीपिकाने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करत कर्करोगाबाबत सांगितलं. तसेच माझ्यासाठी प्रार्थना करा असंही दीपिकाने या पोस्टद्वारे म्हटलं. यावेळी दीपिका खूपच भावुक झाली. दीपिका म्हणाली, “कर्करोग हा प्रत्येकासाठी भीतीदायकच शब्द आहे. कुटुंबासाठी तसेच रुग्णासाठीही हे सगळं कठीण आहे. पण डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की, तुला हा आजार अशावेळी झाला आहे की तो सहज बरा होईल. फक्त आम्ही हिंमतीने सगळं करत आहोत”.

आणखी वाचा – फक्त लिव्हर कॅन्सरच नाहीतर ‘या’ गंभीर आजाराशी झुंज देतेय दीपिका कक्कर, पतीनेच केला खुलासा, म्हणाला, “एकाच वेळी अनेक आजार…”

View this post on Instagram

A post shared by Dipika Kakkar 🔵 (@dipika_kakkar.official)

दीपिकाने तिच्या पोस्टद्वारे स्वतःला व कुटुंबाला आधार देत मत मांडलं. यावर चाहत्यांनी विविध कमेंट केल्या. तसेच तिच्याबाबत चिंता व्यक्त केली. दीपिकाच्या उत्तम आरोग्यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. मात्र तिचा दोन वर्षाला लेक रुहानलाही आईची तळमळ व आजार कळत आहे. याबाबत शोएबने स्वतः व्लॉगद्वारे सांगितलं. तो म्हणाला, “रुहानला दीपिका फिडिंग करत नाही. दूध पाजणं पूर्णपणे बंद आहे. तरीही दोन वर्षांचा रुहान खूप समजूतदारपणे वागत आहे”.

आणखी वाचा – “दारू पिऊन…”, आक्षेपार्ह मॅसेज करणाऱ्या सुशील म्हशीलकरची लोकप्रिय संगीतकाराने बाजू घेताच प्राची पिसाट भडकली, म्हणाली, “त्याने मॅसेज केला तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Dipika Kakkar 🔵 (@dipika_kakkar.official)

दीपिका पुढे म्हणाली, “तो इतका लहान असूनही रुहानला माहित आहे की, आई लहान आहे. दुधासाठी दिवसातून एकदा तरी तो माझ्याकडे येतो आणि बोलतो. पण त्यानंतर रुहानला कळतं की, आई ठिक नाही. पण सगळे आमच्याबरोबर आहेत. म्हणून आम्ही हिंमतीने या सगळ्याचा सामना करत आहोत”. दीपिका व शोएबने सगळं काही चाहत्यांसमोर मांडलं. आता लवकरच दीपिकाची सर्जरी होणार आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी ती सगळ्याचा हिंमतीने सामना करत आहेत.

Tags: Dipika Kakar HealthDipika kakar liver cancerentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Yuvika Chaudhary Pregnancy
Lifestyle

युविका चौधरीसाठी गरोदर राहणं होतं इतकं कठीण, शेवटी IVF चा अवलंब करावा लागला कारण…

मे 30, 2025 | 6:30 pm
Bharti singh Harsh limbachiya
Entertainment

“आम्ही कर्ज काढून जगतोय”, भारती सिंह व तिच्या नवऱ्याचा वाईट काळ, स्वतःच केला खुलासा, कमी पैसे मिळतात अन्…

मे 30, 2025 | 6:27 pm
Gautami patil On Vaishnavi Hagawane
Social

“वैष्णवीबरोबर झालं ते चूक आहे”, गौतमी पाटील स्पष्टच बोलली, बैलासमोर नाचलेल्या व्हिडीओवरही केलं भाष्य, म्हणाली…

मे 30, 2025 | 5:24 pm
Kunal Kamra On Devendra Fadnavis
Entertainment

“चार लोकंही शो ऐकत नाहीत”, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर कुणाल कामराने सुनावलं, म्हणाला, “लवकरच मुंबईत शो करणार आणि…”

मे 30, 2025 | 4:19 pm
Next Post
Amruta Subhash Shocking Revelation

कंबरेवर हात ठेवला, वाईट स्पर्श केला अन्…; अमृता सुभाषनं सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, "तो ज्येष्ठ निर्माता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.