शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आठ महिन्यांच्या आहे लेक, आता पुन्हा गरोदर दीपिका कक्कर?, फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हैराण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 14, 2024 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dipika Kakkar Troll

आठ महिन्यांच्या आहे लेक, आता पुन्हा गरोदर दीपिका कक्कर?, फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हैराण

मालिकाविश्वातील एका लोकप्रिय कपलची नेहमीच चर्चा सुरु असते. विशेषतः सोशल मीडियावर ही जोडी चर्चेत असते. ही जोडी म्हणजे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम. या लोकप्रिय जोडीचा २२ फेब्रुवारी २०१८ मध्ये शाही विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटोस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तसेच, लग्नाच्या पाच वर्षानंतर या जोडप्याने २१ जून २०२३ रोजी त्यांच्या लहानग्यांचे म्हणजेच रुहानचे स्वागत केले. दीपिका-शोएब आपल्या मुलांबरोबरचे सुंदर फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Dipika Kakkar Troll)

अशातच दीपिका व शोएब आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काल रात्री दीपिका तिचा पती शोएबबरोबर एका पंजाबी चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचली होती. कार्यक्रमात शोएब काळ्या रंगाच्या टी-शर्ट व ग्रे जीन्समध्ये खूपच उठून दिसला. तर दीपिका निळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने केस मोकळे ठेवत हेअरस्टाईल केली होती आणि कमीतकमी मेकअप करुन तिचा लूक पूर्ण केला.

आणखी वाचा – विजय सत्याचाच होणार! आर्यन खान प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा निर्णय ऐकताच क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाली, “त्यांच्या बाजूनं…”

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

दीपिका व शोएब यांचे समोर आलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. समोर आलेल्या व्हिडीओखली कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “इतकं वजन वाढलं आहे, थोडं लक्ष द्या”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “तू पुन्हा प्रेग्नंट आहेस का?”. तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, “दीपिका फक्त तिच्या सासरची सेवा करण्यात व्यस्त आहे”. मात्र, काही चाहत्यांनी या जोडप्याचे कौतुक करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – बायकोने हाक मारताच आयसीयूमध्ये ७२ तासांनी डोळे उघडले अन्…; विद्याधर जोशींचा मृत्यूशी संघर्ष, म्हणाले, “तो क्षण…”

या कार्यक्रमातील दीपिका व शोएब यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री पुन्हा गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, फोटोंमध्ये अभिनेत्रीचे वजन खूप वाढलेले दिसत आहे. या अफवांवर अद्याप दीपिका वा शोएबने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags: dipika kakkardipika kakkar and shoaib ibrahimDipika Kakkar Trollentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Amruta khanvilkar Block Himanshu Malhotra
Entertainment

“लगेच चिडली आणि…”, अमृता खानविलकरने नवऱ्याला केलेलं अनफॉलो, हिमांशू अखेर म्हणाला, “रागारागात तिने मला…”

मे 17, 2025 | 11:20 am
Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
Next Post
Vastushastra making these five habits can bring happiness to your home see the details

घरामध्ये तुम्ही 'या' पाच गोष्टी करत असाल तर कधीच होणार नाही पैशांची भरभराट, वेळीच टाळा अन्यथा आर्थिक नुकसान वाढणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.