गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धनुषने वाढदिवशी केली त्याच्या ५१ व्या चित्रपटाची घोषणा; शेखर कम्मुला करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 28, 2023 | 11:10 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
dhanush 51th movie announced, directed by shekhar kammula

dhanush 51th movie announced, directed by shekhar kammula

दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये ओळखला जाणारा अभिनेता धनुष आज त्याचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्याने त्याच्या आगामी ५१व्या चित्रपटाची घोषणा केल्याने चाहते खुश झाले आहे. धनुषच्या या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक शेखर कम्मुला करणार असून हा चित्रपट पाच भारतीय भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (dhanush 51th movie announced)

चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्मात्यांनी धनुषच्या वाढदिवसापूर्वी त्याच्या नव्या चित्रपटाचे कन्सेप्ट पोस्टर रिलीज केले. #D51 असे सध्याचे टायटल आहे, जे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या केवळ चित्रपटाची घोषणा झाली असून चित्रपटाची स्टोरी आणि इतर कलाकारांबद्दल लवकरच कळणार आहे. डॉलर ड्रीम्स या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक शेखर कम्मुला यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले असून त्यांनी आनंद, गोदावरी, हॅपी डेज आणि लीडर आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. धनुषचा हा चित्रपट तामिळसह हिंदी, तेलगू, मल्याळम, कन्नड आदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (dhanush 51th movie poster out)

पहा धनुषच्या या नव्या चित्रपटाचे पोस्टर (dhanush 51th movie poster out)

View this post on Instagram

A post shared by Sekhar Kammula (@kammula.sekhar)

सध्या धनुष त्याचा आगामी ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटाच्या रीलिज व प्रमोशनमध्ये व्यस्त असून काही दिवसांपूर्वी त्याने चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. कॅप्टन मिलरमध्ये धनुष्य एका हिंसक अंदाजात दिसत आहे, ज्यात त्याच्या अवतीभोवती अनेक मृतदेह विखुरलेले दिसतात. दिग्दर्शक अरुण माथेश्वरन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले, तर प्रियंका मोहन, शिवा राजकुमार, सुदीप किशन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिवाय तो निर्माते आनंद एल राय यांच्यासोबत ‘तेरे इश्क में’ मध्येही दिसणार आहे, जो सुपरहिट ‘रांझना’चा सिक्वेल असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेता धनुषचे आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत, ज्यात मारी, VIP, रांझना, ३, अतरंगी रे अश्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. शिवाय त्याने अनेक हॉलिवूड सिनेमे व वेबसिरीज सुद्धा केलेल्या असून त्याला राष्ट्रीय पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आलेले आहे. (dhanush birthday)

हे देखील वाचा : गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने बदललं होतं नाव, ‘हे’ होत किंग खानचं नाव

Tags: dhanushdhanush 51th movie announcedsouth movies
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Amit bhanushali travelled by mumbai local

'ठरलं तर मग'च्या अमितला चाहत्यांनी ओळखलंच नाही, लोकल ट्रेनने प्रवास करताना फोटो शेअर करत म्हणाला, 'मी त्यांना डुप्लिकेट..'

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.