Dhananjay Powar On Trolling : सोशल मीडिया म्हटलं की ट्रोलिंग हे आलंच. अनेक कलाकार मंडळी ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकताना दिसतात. नेटकरी वाटेल ते बोलून त्यांना ट्रोल करताना दिसतात. लोकांची ही घाणेरडी वृत्ती आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही डिवचू लागली आहे. सोशल मीडियावर असे अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांचे कंटेंट अनेकांच्या पसंतीस पडतात. यापैकी एक नाव म्हणजे कोल्हापूरचा रांगडा गडी डीपी म्हणजेच धनंजय पोवार. धनंजय पोवार त्याच्या मिश्किल स्वभावाने नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतो. त्याचे विनोदी भन्नाट रील नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडतात.
डीपीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एंट्री घेतल्याने तो विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’च्या घरात डीपी अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसला. इतकंच नव्हे तर तो टॉप ५ स्पर्धकांपैकी एक ठरला. डीपी बनवत असलेले विनोदी व्हिडीओ त्याच्या आईबरोबर आणि बायकोबरोबर बनवतो. त्यांच्यातील बॉण्डिंगचं नेहमीच कौतुक होतं. शिवाय डीपीच्या कुटुंबाचा फर्निचरचा व्यवसायही आहे. सोसायटी फर्निचर या नावाने कोल्हापुरात त्यांचं खूप मोठं दुकान आहे.
आणखी वाचा – ऑस्कर पुरस्कारच्या नामांकनाची तारीख पुढे ढकलली, लॉस एंजेलिसच्या जंगलातील अग्नीतांडवमुळे मोठा निर्णय

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या डीपीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये नेटकऱ्याने केलेल्या ट्रोलिंगला डीपीने त्याच्याच भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे. एका नेटकऱ्याने डीपीच्या व्हिडीओखाली कमेंट करत, “याच्या डोक्यातला ‘बिग बॉस’चा किडा याला एक दिवस भिकेला लावेल, कारण ताटामध्ये चांगले अन्न असून सुद्धा त्याचा अपमान करतो आणि याला ‘बिग बॉस’ आठवतो, बाई…”, असं म्हणत डिवचलं. नेटकऱ्याची ही कमेंट आणि त्याच प्रोफाइलचा फोटो शेअर करत, “लोकांच्या नावाने किती बोंबलत बसणार भिकाऱ्या. आता याचा काय विषय”, असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – Video : रणबीर कपूरच्या लेकीचा पापाराझींबरोबर लपाछपीचा खेळ, सगळ्यात गोड व्हिडीओ समोर, दिसते फारच क्युट
तर डीपीने दुसरी स्टोरी पोस्ट करत त्याच नेटकऱ्याची आणखी एका कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. “सगळे घरदार नाटककार झाले आहेत. सर्व सामान्य माणसाची फसवणूक करुन आपला व्यवसाय म्हणजे फर्निचरचे दुकान चालवण्यासाठी आणि लोकांनी यांचे फर्निचर विकत घ्यावे म्हणून नाटक करत आहेत”, असं त्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. यावर डीपीने त्याला उत्तर देत, “लोकांची किती घाणेरडी वृत्ती असेल. काय म्हणून हा माझ्या नावाने बोंबलत आहे. काय माहीत नाही. उठसूट कोणता पण विषय काढायचा आणि बोंबलायचं. अरे बाबा तुला काय मी फसवलंय का?. पैसे घेतलेत का?. काय तुझं लग्न होईना म्हणून गावाची माप काढत बसणार आहेस. अशाने तुला पोरगी कोण देणार रे?”, असं म्हणत चांगलंच प्रतिउत्तर दिलं आहे.