शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहा वर्षांचा संसार मोडत केलं दुसरं लग्न, दोन महिने हनिमून केल्यानंतर वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा घेणार घटस्फोट?, शेअर केलेल्या पोस्टमुळे खळबळ

Saurabh Moreby Saurabh More
मे 25, 2024 | 2:18 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Dalljeit Kaur shared a video of her bridal look and rumors of her divorce with Nikhil Patel.

सहा वर्षांचा संसार मोडत केलं दुसरं लग्न, दोन महिने हनिमून केल्यानंतर वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा घेणार घटस्फोट?, शेअर केलेल्या पोस्टमुळे खळबळ

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या दुस-या लग्नातही काही अडचणी आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. अभिनेत्रीने गेल्या वर्षी व्यावसायिक निखिल पटेलबरोबर दुसरे लग्न केले होते. अशातच आता अशा बातम्या येत आहेत की, या जोडप्यामध्ये काही मतभेद आहेत आणि ते वेगळे होणार आहेत. दरम्यान, दलजीत कौरने तिच्या ब्राइडल लूकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दलजीत कौरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वधूच्या पोशाखात दिसत आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावर निराशा आणि डोळ्यात वेदना दिसत आहेत. या व्हिडीओसह तिने याखाली लिहिलेल्या कॅप्शने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओखालील  कॅप्शनमध्ये दलजीतने असं म्हटलं आहे की, “ती तिच्या मुलांसाठी मौन बाळगून आहे. यावेळी तिला खाली पडू न देण्यासाठी तिचे कुटुंबीयही तिला घट्ट धरून ठेवतात. ती वाट पाहत आहे”.

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “जे काही सत्य आहे ते तुम्ही मुलांना सांगा.” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “किती दिवस तुम्ही सत्य लपवणार आहात?” अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर अनेकांनी ‘तुम्ही मुलांना सर्व सांगितले पाहिजे’, ‘त्यांच्यापासून काही लपवून ठेवले नाही पाहिजे’, ‘सत्य  जाणून घेणे हा त्यांचाही अधिकार आहे’. अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – आधी सासरी जंगी स्वागत आता लेकीला घेऊन इंटरनॅशनल ट्रीपला निघाली सई लोकूर, नवऱ्यासह एअरपोर्टवरील फोटोही केले शेअर, Photo व्हायरल

वास्तविक, दलजीत आणि निखिलच्या घटस्फोटाची बातमी तेव्हा प्रसारित झाली जेव्हा अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या पती निखिल पटेलचे आडनाव इन्स्टाग्रामवरून हटवले. यानंतर लोक असा अंदाज लावू लागले की दलजीत वाईट काळातून जात आहे आणि तिचे दुसरे लग्नही लवकरच तुटणार आहे.

आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’नंतर सागर कारंडेची हिंदी कॉमेडी शोमध्ये एंट्री, कुशल बद्रिके व गौरव मोरेला देणार साथ, प्रोमो समोर

मात्र, या प्रकरणी अभिनेत्रीने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. दरम्यान, १८ मार्च २०२३ रोजी दलजीत व निखिल यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर अभिनेत्री आपल्या पती व मुलासह केनियामध्ये राहत होती. मात्र जानेवारी महिन्यात ही अभिनेत्री भारतात परतली, त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाबद्दलच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या.

Tags: Dalljeit KaurDalljeit Kaur Nikhil Patel DivorceNikhil patel
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Appi Aamchi Collector serial update Amol will bring Appi and Arjun together

अर्जुनचं दुसरं लग्न होऊ न देण्याचा सिंबाचा निश्चय, बाबा असल्याचं सत्यही समोर येणार, लेकच अप्पीच्या आयुष्यात आनंद पुन्हा आणणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.