शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ColdPlay गायक ख्रिस मार्टिन गर्लफ्रेंडसह पोहोचला महाकुंभमध्ये, खांद्यावर घेतली भगवी वस्त्रे, त्रिवेणी संगमात करणार स्नान

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 28, 2025 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Chris Martin participating in Mahakumbh with his girlfriend

ColdPlay गायक ख्रिस मार्टिन गर्लफ्रेंडसह महाकुंभमध्ये सहभागी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

जगप्रसिद्ध असलेल्या ‘कोल्ड प्ले’ बँडचे सध्या भारतात कॉन्सर्ट सुरु आहेत. मुंबईत तीन दिवस कॉन्सर्ट झाल्यानंतर त्यांनी गुजरातमधील रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. मुंबईत हिंदी आणि मराठी बोलून मन जिंकणारा ख्रिस मार्टिन याने आता भारतीयांचे पुन्हा एकदा मन जिंकले आहे. याचे कारण ख्रिस मार्टिन प्रयागराज येथील कुंभमेळ्यात पोहोचला आहे.  ख्रिस मार्टिन आणि त्याची मैत्रीण डकोटा जॉन्सन प्रयागराजला पोहोचले आहेत. ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन सोमवारी, २७ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्यात दिसले. ख्रिसने निळा टी-शर्ट आणि खांद्यावर केशरी रंगाचे वस्त्र घातले होते. डकोटाने तिच्या डोक्याभोवती केशरी वस्त्र गुंडाळले होते. (Chris Martin participating in Mahakumbh)

प्रयागराजला जाण्याआधी एक दिवस कोल्ड प्लेने गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खास परफॉर्मन्स दिला होता. कॉन्सर्ट दरम्यान क्रिसने ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मां तुझे सलाम’ आणि ‘वंदे मातरम’ ही देशभक्तीपर गाणी गायली. त्यांनी ‘भारत माता को सलाम’ गाऊन मैफलीची सांगता केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशातच त्याचे प्रयागराजमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या व्हिडीओवर अनेकजण मार्टिनचे कौतुक करताना दिसत आहेत. महाकुंभ मध्ये सामील झाल्याबद्दल आणि भगवे वस्त्र परिधान केल्यानिमित्त अनेकांनी जय सनातन अशा घोषणा केल्या आहेत.

#WATCH | Uttar Pradesh | American actress Dakota Johnson and co-founder of the rock band Coldplay & singer Chris Martin at Prayagraj #MahaKumbhMela2025 pic.twitter.com/8kttMyjrdG

— ANI (@ANI) January 27, 2025

आणखी वाचा – Video : स्वत:च्या शेतात रमला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, नांगरणी करतानाचा व्हिडीओ समोर, साधेपणाचं कौतुक

ब्रिटिश रॉक बँड कोल्ड प्लेचा भारतातील शेवटचा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी गुजरातमध्ये झाला. कोल्ड प्लेचा शो गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला. यावेळी ख्रिस मार्टिन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. फक्त शुभेच्छाच नाही तर यावेळी ख्रिसने ‘वंदे मातरम्’ हे देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांना चकित केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – देवोलीना भट्टाचार्जीने दीड महिन्यांनी केलं बाळाचं नामकरण, ठेवलं ‘हे’ खास नाव, नेमका अर्थ काय?

त्यानंतर आता ख्रिस मार्टिनचे महाकुंभमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, कोल्ड प्लेने २५ आणि २६ जानेवारी रोजी अहमदाबादमधील मैफिलीसह भारतातील त्यांच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स टूरची सांगता केली. यापूर्वी १८, १९ आणि २१ जानेवारीला त्यांनी मुंबईत परफॉर्म केले होते.

Tags: Chris Martin participating in MahakumbhChris Martin participating in Mahakumbh with his girlfriendColdPlay singer Chris Martin participating in Mahakumbh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Rakhi Sawant Marriage

दोन लग्न मोडल्यानंतर राखी सावंतचा तिसऱ्या लग्नाबाबत खुलासा, पाकिस्तानात बांधणार लग्नगाठ, म्हणाली, "आमचं रिसेप्शन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.