गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी निलेश साबळेची एक्झिट, आता ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटचा एपिसोडही झाला शूट

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 13, 2024 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Chala Hawa Yeu Dya zee Marathi comedy reality show is going off air soon see the details

आधी निलेश साबळेची एक्झिट, आता 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटचा एपिसोडही झाला शूट

छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आजपर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नाही तर या शोने जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवले. या कार्यक्रमाने भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, योगेश शिरसाट, रोहित चव्हाण, स्नेहल शिदम यांसारख्या अनेक विनोदवीरांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. एकेकाळी हा शो लोकप्रियेतच्या शिखरावर होता. सर्वत्र खऱ्या अर्थाने याच शोची हवा होती.

मध्यंतरी ‘चला हवा येऊ द्या’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र काही कारणांमुळे हा कार्यक्रम पुन्हा सूरू करण्यात आला. मात्र आता अखेर हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या या शोला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष भाग सुरु आहेत. त्यानंतर आता हा शो ऑफ एअर जाणार आहे. म्हणजेच हा शो बंद होणार असून ‘चला हवा येऊ द्या’ऐवजी काही नवीन मालिका सुरु होणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_vitthalrao_wadhave)

काही दिवसांपूर्वी सागरने या शोमधून निरोप घेतला. त्यानंतर नुकताच या शोमधून डॉ. निलेश साबळेनेही शो सोडल्याची घोषणा केली. तब्येतीच्या कारणास्तव त्याने हा शो सोडल्याचे सांगितले. कुशलनेही हिंदी शोमध्ये एन्ट्री घेतल्यामुळे त्याने हा  शो सोडला असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. अशातच श्रेया बुगडे व अंकुर वाढवे या कलाकारांनीदेखील या शोनिमित्त काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.  

आणखी वाचा – पैशांसाठी McDonald मध्ये झाडू मारायचं काम करायच्या स्मृती ईराणी, एकता कपूरनेही कामासाठी नाकारलं अन्…; कसं बदललं आयुष्य?

झी मराठीवर लवकरच दोन नवीन मालिका प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. १८ मार्चपासून रात्री ९.३० ला ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका दाखवली जाणार आहे. तर १०.०० वाजता ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, हा शो कायमचा बंद झाला आहे की, या शोने काही दिवसांपुरता ब्रेक घेतला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

आणखी वाचा – “त्याची जागा…”, निलेश साबळेनंतर सुत्रसंचालक म्हणून ‘चला हवा येऊ द्या’मध्ये संकर्षण कऱ्हाडे, म्हणाला, “त्याने निर्माण केलेलं…”

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ या शोचा पहिला भाग १८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसारीत झाला होता. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘चला हवा येऊ द्या’ने आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. मात्र, आता हा कार्यक्रम बंद होत असल्याने चाहते नाराज झाले आहेत. 

Tags: मनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी विनोदी कार्यक्रमझी मराठीझी मराठी विनोदी कार्यक्रमचला हवा येऊ द्याchala hawa yeu dyaentertainment newsMarathi Comedy Showmarathi entertainment newsMarathi newszee marathiZee Marathi Comedy show
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Mugdha Vaishampayan is happy to eat home cooked food after a long time

लग्नानंतर असं आयुष्य जगत आहे मुग्धा वैशंपायन, कोकणात सासरच्या घरी करत आहेत लाड, घरचं जेवण पाहून म्हणाली, "खूप दिवसांनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.