Govinda Wife Sunita Gives Reaction Video : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा गुरुवारी मुंबई येथे तिचा मुलगा यशवर्धन आहुजा याच्याबरोबर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात दाखल झाली. तिने तिच्या स्टाईलिश अंदाजाने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले. गोविंदाची पत्नी सुनीता हिचा या पुरस्कार सोहळ्यातील लूक चर्चेत आलाच मात्र तिला पापराजींनी विचालेल्या प्रश्नाचं दिलेल्या उत्तराने ती अधिक चर्चेत आली. पापराजींकडून जेव्हा तिला ‘गोविंदा कोठे आहे?’, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने धक्कादायक प्रतिक्रिया दिली. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोविंदाची पत्नी सुनीता आणि यशवर्धन आहुजा यांना पापराजींनी विचारले की, “गोविंदा सर कुठे आहेत?”.
पापराजींचा हा प्रश्न ऐकून सुनिताने आश्चर्यचकित झाल्याचं भासवलं आणि ‘काय!’ असे विचारलं. त्यानंतर ती नेहमीप्रमाणे हसली. मग एका छायाचित्रकाराने सांगितले की, कदाचित गोविंदा उशिरा येणार आहे. यावर सुनीता हसत हसत म्हणाली, ‘लास्ट बट नॉट लिस्ट’. गोविंदाच्या नावाखाली सुनिताने दिलेली प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांना काही आवडली नाही. एकाने लिहिले, “तिने हे हे लक्षात ठेवले पाहिजे की ते आणि त्यांची मुले जे काही ज्ञात आहेत ते ते गोविंदा आणि त्यांच्या स्टारडममुळे”. दुसर्याने टिप्पणी केली, “अयशस्वी कुटुंब. त्याला घरात बंद करुन आली आहे ही काकू”. तर आणखी एकाने म्हटलंय, “ही वेगळ्याच लेव्हलची राखी सावंत आहे”.
गोविंदा आणि सुनीताने मार्च १९८७ मध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगी टीना आणि एक मुलगा यशवर्धन आहे. सुनिता बर्याचदा तिच्या कुटुंबासमवेत सोशल मीडियावर खास क्षण शेअर करते. काही दिवसांपूर्वी, त्यांचे लग्न चर्चेत होते, कारण त्या दोघांच्या घटस्फोटाचा अंदाज लावला जात होता. गेल्या महिन्यात, माध्यमांच्या अहवालात असे म्हटले आहे की फरक आणि जीवनशैलीतील फरकांमुळे गोविंदा आणि सुनीता वेगळे होण्याचा विचार करत आहेत.
आणखी वाचा – श्रेयस तळपदेवर फसवणुकीचा आरोप, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा अन्..; नेमकं प्रकरण काय?
या अफवांमध्ये असेही म्हटले गेले होते की, मराठी अभिनेत्रीशी गोविंदाची वाढती जवळीकमुळे या जोडप्यात तणाव निर्माण केला आहे. गोविंदाच्या टीमने मात्र सर्व दावे नाकारले. या अफवांवर, सुनिता म्हणाली, “जेव्हा जेव्हा त्यांना राजकारणात सामील व्हावे लागले, तेव्हा माझी मुलगी तरुण होत होती, मग सर्व कामगार घरात येत असत. आता एक तरुण मुलगी आहे, आम्ही आहोत, आम्ही शॉर्ट्स घालतो आणि घरात फिरतो, म्हणून आम्ही कार्यालय समोर घेतले. आणि म्हणून गोविंदा कामानिमित्त घराच्या समोरच असलेल्या कार्यलयात राहतो. मला आणि गोविंदाला या जगात कोणी वेगळे करणारा असले त्याने माझ्यासमोर यावं”.